मध्य रेल्वेने (Central Railway) टॉवर वॅगन्समध्ये इंधन भरण्याची एक आधुनिक प्रणाली स्विकारली आहे. ज्यामुळे महसूल बचत झाली असून टॉवर वॅगन्सची सतत उपलब्धता सुनिश्चित केली गेली आहे. मुंबई विभागाने हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) च्या मालकीच्या रोड बाउझर्सद्वारे टॉवर वॅगन्स थेट त्यांच्या स्थिर स्थानावर इंधन भरण्याची नवीन प्रणाली स्वीकारली आणि लागू केली आहे. रोड बाऊझरद्वारे इंधन भरण्याच्या प्रकियेमध्ये ज्या ठिकाणी टॉवर वॅगन उभ्या आहेत, त्याच ठिकाणी इंधन भरण्याची सुविधा प्रदान करणे हे समाविष्ट आहे. (Central Railway)
टॉवर वॅगन पार्क केलेल्या कोणत्याही ठिकाणी येण्यासाठी आणि किरकोळ किमतीत डिजिटली कॅलिब्रेटेड पंपांद्वारे डिझेल भरण्यासाठी एचपीसीएल बाऊझर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. टॉवर वॅगन पर्यवेक्षकांना स्वाइप करून पेमेंट करण्यासाठी डिजिटल कार्ड प्रदान करण्यात आले आहेत. (Central Railway)
(हेही वाचा – MSRDC: कोकण द्रुतगती महामार्ग, सागरी मार्गालगत १३ विकास केंद्रे विकसित होणार)
अभियांत्रिकी यंत्रणांकरिता लवकरच ही सुविधा होणार सुरु
मुंबई विभागात वेगवेगळ्या ठिकाणी १६ टॉवर वॅगन्स आहेत ज्यांना रेल्वे ग्राहक डेपो (RCD), कल्याण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल येथे नियमितपणे ३-४ वेळा इंधन पुरवण्यात येते. टॉवर वॅगन्सची वाहतूक स्थिर स्थानापासून आरसीडीपर्यंत इंधन भरण्यासाठी आणि पाठीमागे क्रू ची वाहतूक, मार्ग आणि निष्क्रिय कालावधीसह अतिरिक्त डिझेलचा वापर समाविष्ट आहे. (Central Railway)
इंधन भरण्याच्या या नवीन प्रणालीमुळे ड्रममधील वाहतुकीदरम्यान चोरीची शक्यता कमी झाली असून टॉवर वॅगन्स इंधन केंद्रांवर मागे घेऊन जाण्यासाठी चालक दल, मार्ग आणि डिझेलचा अनावश्यक अपव्यय देखील वाचला आहे. यातून टॉवर वॅगनची सतत उपलब्धता सुनिश्चित होते. लवकरच ही सुविधा अभियांत्रिकी यंत्रणांकरिता सुरू करण्यात येणार आहे. (Central Railway)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community