आठवड्याच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वेच्या प्रवाशांना फटका बसला आहे. मध्य रेल्वेची जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची बातमी समोर येत आहे. करीरोड स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाड़ झाल्याने एक एक्सप्रेस करीरोड स्थानकाजवळ थांबली आहे. त्यामागे लोकलही अडकून पडल्याने, जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
एक्सप्रेस थांबल्याने त्यामागे लोकलची एकापाठोपाठ एक अशी या रांग लागलेली आहे. प्रवाशांनी नजीकच्या स्टेशनवर उतरुन धिम्या लोकल पकडत, प्रवासाला सुरुवात केली आहे. परंतु अजूनही मध्य रेल्वेच्या स्थानकांवर कोणतीही अनाऊन्समेंट होत नसल्याने, वाहतूक पुर्वपदावर कधी येणार याचीही कल्पना प्रवाशांना नाही.
( हेही वाचा: पैसे दुप्पट करायचेत ? वाचा काय सांगतात तज्ज्ञ )
मागच्या अर्ध्या तासापासून मध्ये रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. फास्ट ट्रॅकवरील रेल्वे एकाच जागेवर खोळंबल्या आहेत. आठवड्याचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी वाहतूक विस्कळीत झाल्याने, चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
18 ऑगस्टलाही जलद मार्गाची वाहतूक विस्कळीत
18 ऑगस्टला भांडुप आणि नाहूरदरम्यान जलद मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने, डाऊन फास्ट मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. या तांत्रिक बिघाडाचा फटका प्रवाशांना सहन करावा लागला होता.
Join Our WhatsApp Community