एक्सप्रेसमधील तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची (Central Railway) वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. कळवा रेल्वे स्थानकात एका एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत.
(हेही वाचा –Uddhav Thackeray : ‘मातोश्री’चा धाक गेला कुठे?)
दरम्यान सकाळी लाखो चाकरमानी हे मुंबई लोकलने प्रवास करत ऑफिस गाठतात. मात्र अचानक हा बिघाड झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऑफिसला पोहोचायला, तसेच विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास उशीर झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अनेक कर्मचारी संतप्त झाले आहेत. तसेच रेल्वे उशिराने धावत असल्याने स्टेशनवरही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. (Central Railway)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community