एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड! मध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकाजवळ शनिवारी दुपारी अडीचच्या दरम्यान एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. इंजिनात बिघाड झाल्यामुळे एक्सप्रेस तासभरापासून एकाच जागी उभी असल्यामुळे त्याच्या मागे लोकलची रांगा लागल्या आहेत. यात अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. जवळपास तासाभरानंतरही लोकल एकाच जागी उभ्या असल्याने अखेर प्रवाशांनी लोकलमधून उड्या टाकून ट्रॅकवर चालत जाऊन स्थानक गाठण्याचा प्रयत्न केला.

मध्य रेल्वे विस्कळीत

आधीच उकाड्यामळे मुंबईकर हैराण झाले आहेत त्यात लोकलचा खोळंबा झाल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. यामुळे जलद मार्गावरील सर्व गाड्या मागील तासभरापासून रखडल्या आहेत.

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here