ऐन गर्दीच्या काळात मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कामावर वेळेत पोहचण्याची धावपळ करणाऱ्या प्रवाशांचा मोठा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. मध्य रेल्वे मार्गावरील सेवा तब्बल १५ ते २० मिनीटं उशीराने सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भांडुप आणि नाहूरदरम्यान जलद मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, लेट मार्क लागण्याच्या भितीने प्रवाशांकडून दुसऱ्या पर्यायी मार्गाची शोधा-शोध देखील सुरू करण्यात आली आहे.
(हेही वाचा – मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकांवर ‘आधार’)
भांडुप आणि नाहूरदरम्यान जलद मार्गावर तांत्रिक बिघाड झाल्याने डाऊन फास्ट मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या तांत्रिक बिघाडाचा फटका दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागला आहे. सकाळीच लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याने सर्वच स्थानकांवर गर्दी झाली असून प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे मुंबईत खड्ड्यांमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. अंधेरीकडे येणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. जोगेश्वरी, गोरेगाव आणि मालाडमध्ये द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.
Join Our WhatsApp Community