मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर! सुशोभीकरणाच्या कामांना फ्लोरिकल्चरची जोड, काय आहे हा अनोखा उपक्रम

124

मध्य रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी विशेष योजना आखली आहे. पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी मध्य रेल्वेने आपल्या झोनमध्ये विविध हरित उपक्रम राबवले आहेत.

( हेही वाचा : कोकणात जाताय? १ डिसेंबरपासून सुरू होणार टोल वसुली, चाकरमान्यांच्या खिशाला बसणार कात्री!)

मुंबई विभागाने फुलशेती आणि रेल्वे रुळांचे सुशोभीकरण यांचा मेळ घालण्याची अनोखी संकल्पना आणली आहे. या संकल्पनेत रुळांची साफसफाई करणे, रेल्वे रुळांवरील वनस्पती, कोरडे गवत आणि चिखल काढणे, माती आणि खताचे नूतनीकरण, नवीन रोपे लावणे आणि छाटणे, सध्याच्या वनस्पतींची छाटणी आणि पाणी देणे यांचा समावेश आहे. मेगाब्लॉक दरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामांसह ही कामे एकाच वेळी केली जाणार आहेत.

या नवीन संकल्पनेबाबत मुंबई विभाग अतिशय सकारात्मक असून मार्च-२०२३ अखेर ५०,००० रोपे लावण्याची योजना आहे. मुख्य मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि भायखळा तसेच आणि हार्बर मार्गावरील सँडहर्स्ट रोड आणि वडाळा रोड स्थानकांदरम्यान १२,००० हून अधिक रोपे लावण्यात आली आहेत. मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना ठाकूर कॉलेज आणि खालसा कॉलेजच्या NSS स्वयंसेवकांच्या टीमने या कामात मदत केली. उर्वरित कालावधीत घाट विभागांसह विविध ठिकाणी ४००० रोपांची लागवड केली जाईल. इगतपुरी आणि आसपास १७,००० रोपे तसेच लोणावळा आणि आसपास १७,००० रोपे लावली जातील. ही संकल्पना मध्य रेल्वेच्या पर्यावरण आणि गृहव्यवस्थापन विभागाच्या ग्रीन इनिशिएटिव्हचा एक भाग आहे.

मध्य रेल्वे, मुंबई विभागाच्या वृक्षारोपण आणि उद्यानांच्या इतर हरित उपक्रमांमध्ये वाडीबंदर येथील फुलपाखरू उद्यान समाविष्ट आहे जे मुंबई विभागातील पहिले उद्यान आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथील मियावाकी जंगल ही एक वेगाने वाढणारी दाट वृक्षारोपण प्रणाली आहे जी जैवविविधता सुधारण्यास, ऑक्सिजनची पातळी वाढविण्यात आणि प्रदूषण कमी करण्यास देखील मदत करते. निसर्गाचे जतन आणि संवर्धन करण्यात मध्य रेल्वे नेहमीच अग्रेसर आहे. येथील फलोत्पादन विभाग विविध वनस्पती आणि फुलांच्या प्रदर्शनात अनेक पुरस्कार जिंकले आहेत. हा उपक्रम हिरवेगार आणि निरोगी रेल्वेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे असे रेल्वेने सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.