मध्य रेल्वेच्या जलद लोकलचा खोळंबा; प्रवाशांची गैरसोय

सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाड्यांचा पुन्हा एकदा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील जलद गाड्या ११.३० वाजल्यापासून विलंबाने धावत आहेत, अशी घोषणा घाटकोपर, कुर्ला, ठाणे, कल्याण, डोंबिवली या स्थानकांत करण्यात येत आहे. याचे नेमके कारण अद्याप मध्य रेल्वेने स्पष्ट केलेले नाही.

( हेही वाचा : T20 World Cup : भारताचे दोन वरिष्ठ खेळाडू निवृत्ती घेणार? सुनील गावस्करांचे सूचक वक्तव्य)

जलद लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊन सर्व प्रवासी धीम्या लोकल गाड्यांकडे वळत आहे. सीएसएमटी आणि कल्याण- डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलही विलंबाने धावत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवर विविध कारणांमुळे लोकल सेवा विस्कळीत होत आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाड, त्याचबरोबर मेल-एक्स्प्रेस गाड्यांमधील साखळी खेचण्याच्या प्रकारांमुळे गाड्या विलंबाने धावत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here