मध्य रेल्वे आता ‘या’ क्षेत्रातही आघाडीवर!

113

मध्य रेल्वेने सर्व क्षेत्रीय रेल्वेमध्ये पार्सल महसुलात आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे. मध्य रेल्वेने फेब्रुवारी-२०२२ या महिन्यात पार्सल महसूल रु. २८.१६ कोटी तसेच एप्रिल-२०२१ ते फेब्रुवारी-२०२२ या कालावधीत महसूल रु. २८८ कोटी मिळवले जे मागील वर्षी याच कालावधीत प्राप्त झालेल्या रु. १३१.३४ कोटींच्या महसुलापेक्षा ११९ टक्के अधिक आहे. फेब्रुवारी-२०२२ पर्यंत ६.७५ लाख टन पार्सल वाहतूक झाली आहे.

म्हणून आघाडीवर

पार्सल वाहतुकीतील वाढ मुख्यत्वे किसान रेलच्या यशस्वीपणे चालवण्यामुळे झाली आहे, ज्यामुळे या भागातील नाशवंत वाहतूक देशाच्या दूरवरच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचते. आर्थिक वर्ष २०२१- २२ मध्ये (एप्रिल-२०२१ ते फेब्रुवारी-२०२२), किसान रेलने विविध गंतव्यस्थानांवर ८४७ फेऱ्या केल्या आहेत ज्यातून ३.०६ लाख टन वाहतूक करण्यात आली आहे. किसान रेलच्या सुरूवातीपासून आतापर्यंत १ हजार ७४ फेऱ्या चालवण्यात आल्या आहेत, ज्यातून ३.७८ लाख टन वाहतूक करण्यात आली.

उद्योजकांना फायदा

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, रेल्वेने पार्सल वाहतूक ही ग्राहकांसाठी उपलब्ध सर्वात सुरक्षित, जलद आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे. ते म्हणाले की, किसान रेल ही एक मोठी यशोगाथा आहे ज्याचा शेतकरी तसेच लघू आणि मध्यम उद्योजकांना मोठा फायदा झाला आहे.

मागच्या वर्षीपेक्षा अधिक महसूल

मध्य रेल्वे सर्व भारतीय रेल्वेत गैर-प्रवासी शुल्क (नॉन-फेअर) उत्पन्नामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. एप्रिल २०२१ – फेब्रुवारी २०२२ दरम्यान या गैर-प्रवासी शुल्क (नॉन-फेअर) उत्पन्नामधील महसूल रु. २६.९२ कोटी आहे जो मागील वर्षी याच कालावधीत मिळवलेल्या महसुलापेक्षा १५१ टक्के अधिक आहे.

( हेही वाचा राज्यपाल अभिभाषण न करता परतले, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल ‘लक्ष्य’ )

परवानाधारकांना परवानगी

मुंबई, नागपूर आणि पुणे विभागाने ‘हायब्रीड ओबीएचएस कॉन्ट्रॅक्ट्स ऑन अर्निंग मोड्स’ अंतर्गत ६ गाड्यांसाठी (मुंबई- नागपूर दुरांतो एक्सप्रेस, मुंबई- पुणे डेक्कन एक्सप्रेस, दादर- सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेस, मुंबई- करमळी तेजस एक्सप्रेस, मुंबई- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस आणि पुणे- अहमदाबाद दुरांतो एक्स्प्रेस) वार्षिक रु.४०.५ लाख एक वर्षासाठी परवाना शुल्कासह काम (कंत्राट) दिले आहे. या योजनेअंतर्गत, बाह्य आणि अंतर्गत जाहिराती, इन्फोटेनमेंट, डिस्पोजेबल लिनेनसह बहुउद्देशीय वस्तूंचे ट्रेनमधील वेंडिंग आणि प्रमोशनल अधिकाराची परवानगी परवानाधारकांना आहे. यामुळे ओबीएचएस आणि बेडरोल सेवांतील खर्चात बचत होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.