होळीच्या सणाला मुंबईहून अनेक चाकरमानी कोकणात जातात. शिमग्याच्या सणाला कोकणात विशेष महत्त्व आहे. कोरोनामुळे जवळपास दोन वर्ष या उत्सावावर निर्बंध होते. परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आली असून चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. एसटी महामंडळाची सेवाही बंद असल्यामुळे कोकणवासीयांना गावी जाण्यासाठी अनेक समस्या निर्माण होत होत्या. याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.
( हेही वाचा : मध्य रेल्वेच्या ‘या’ स्थानकांवर सौरऊर्जा प्रकल्प सुरू! होणार लाखोंची बचत )
मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या
- कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. पुणे जंक्शन-करमाळी-पुणे जंक्शन आणि करमाळी-पनवेल-करमाळी या दोन गाड्या सोडल्या जाणार आहेत.
- पुणे जंक्शन-करमाळी ही विशेष साप्ताहिक गाडी ११ आणि १८ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता पुणे जंक्शन येथून सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता करमाळीला पोचेल.
- करमाळी-पनवेल ही दुसरी विशेष साप्ताहिक गाडी १२ आणि १९ मार्चला सकाळी ९.२० वाजता सुटेल
- कोकणातील वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिविम या स्थानकांवर या गाड्या थांबणार आहेत.
- मुंबईकर चाकरमान्यांना या विशेष गाड्या पनवेल येथून पकडता येणार आहेत.