Central Railway : हार्बर, ट्रान्स हार्बर प्रवाशांचा प्रवास होणार वेगवान 

लोकलचा वक्तशीरपणा देखील वाढणार असून प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे

111
Central Railway : हार्बर, ट्रान्स हार्बर प्रवाशांचा प्रवास होणार वेगवान 
Central Railway : हार्बर, ट्रान्स हार्बर प्रवाशांचा प्रवास होणार वेगवान 

मध्य रेल्वेच्या सातत्याने होणाऱ्या विलंबामुळे प्रवासी त्रस्त आहेत.  यावरच तोडगा म्हणून  मध्य रेल्वेने हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला असून हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल वेगमर्यादा ताशी ८० किमीवरून ताशी १०० किमी करण्यात येणार आहे.यामुळे थोडीतरी वेळेची बचत होणार आहे. (Central Railway)

सध्या सीएसएमटी -पनवेल  लोकल प्रवासासाठी एक तास २० मिनिटे, तर,ठाणे-वाशी लोकल प्रवासासाठी ३० मिनिटे लागतात. हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील वेगमर्यादा ताशी ८० किमीवरून १०० केल्याने प्रवाशांच्या प्रवासातील १० मिनिटे कमी होतील. लोकलचा वक्तशीरपणा देखील वाढणार असून प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली. (Central Railway)

(हेही वाचा : Mumbai-Pune Megablock : विकेंडला मुंबई-पुणे प्रवास करताय, मग जाणून घ्या काय आहे रेल्वेचे बदलेले वेळापत्रक)

हार्बर मार्गावरील टिळकनगर ते पनवेल दरम्यानचा प्रवास वेगवान होईल. सीएसएमटी – टिळकनगर दरम्यानच्या दर दोन रेल्वे स्थानकांमधील अंतर १ ते २ किमी आहे. त्यामुळे प्रत्येक स्थानकात लोकल थांबवून पुन्हा वेग कमी-जास्त करावा लागतो. मात्र टिळकनगर स्थानकानंतर दोन स्थानकांतील अंतर वाढते. त्यामुळे यादरम्यान लोकलचा वेग वाढवणे शक्य आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.