मध्य रेल्वेने सर्व स्थानके, विभाग, प्रतिष्ठाने, डेपो, कार्यशाळा, शेड, सर्व विभाग भंगारमुक्त करण्यासाठी “झिरो स्क्रॅप मिशन” साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
चालू वर्षांत एप्रिल २०२२ ते जून २०२२ दरम्यान, मध्य रेल्वेने भंगाराच्या विक्रीतून १०० कोटी ८ लाख रुपये महसूलाची नोंद केली आहे. जी मागील वर्षाच्या याच कालावधीतील म्हणजेच एप्रिल २०२१ ते जून २०२१ पर्यंत प्राप्त झालेल्या ६१ कोटी ४२ लाख महसुलाच्या तुलनेत ६२.९४ टक्के अधिक आहे.
( हेही वाचा: LPG Cylinder price: एलपीजी गॅस सिलेंडर १९८ रुपयांनी स्वस्त )
परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपुरक राहण्यास मदत
मध्य रेल्वेने मिळवलेला १०० कोटी ८ लाख कोटींचा भंगार विक्री महसूल हा एप्रिल ते जून या कालावधीतील भंगाराच्या विक्रीतून मिळवलेला वर्षातील सर्वाधिक प्राप्त महसूल आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, भंगाराची विल्हेवाट लावल्याने केवळ महसूलच मिळत नाही तर परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासही मदत झाली आहे.
Join Our WhatsApp Community