Fog safety Device : धुक्यातही रेल्वे गाड्या धावणार सुसाट; रेल्वे कडून नवीन उपाय योजना

धुक्यातही रेल्वेचा वेग कायम राहण्यासाठी धुके सुरक्षा यंत्रणा बसवली जाणार आहे.

377
Fog safety Device : धुक्यातही रेल्वे गाड्या धावणार सुसाट; रेल्वे कडून नवीन उपाय योजना
Fog safety Device : धुक्यातही रेल्वे गाड्या धावणार सुसाट; रेल्वे कडून नवीन उपाय योजना

अनेक वेळा धुक्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याच्या घटना घडतात आणि याच धुक्याच्या वातावरणाच्या समस्येवर मात करण्यासाठी मध्य रेल्वे ने ५०० धुके सुरक्षा यंत्रणा (Fog safety Device) खरेदी केली आहेत.  ती सर्व विभागांना वितरित केली आहेत. या प्रणालीमुळे सिग्नलची दृश्यमानता कमी असताना ट्रेन चालकांना सिग्नलची सर्व माहिती मिळेल. त्यामुळे धुक्यातही गाड्यांचा वेग कमी होणार नाही. (Fog safety Device )

हिवाळ्यातील दाट धुक्यानंतर दृश्यमानता कमी झाल्यामुळे रेल्वे तासंतास खोळंबून राहत होत्या त्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होत होती. रेल्वे गाड्यांना ताशी ३० ते ६० या वेगाने धावावे लागते. काही दिवसांपूर्वी पुणे विभागाला याचा अनुभव आला होता. दाट धुक्यामुळे पहाटे २ ते ७ या वेळे दरम्यान अनेक गाड्या उशिराने धावत होत्या. याला पर्याय म्हणून मध्य रेल्वेने धुके सुरक्षा प्रणाली खरेदी केली आहे. त्याचे विभागनिहाय वाटप केले जाते. त्यानुसार, सध्या पुणे विभागाला अशा दहा प्रणाली मिळाल्या आहेत. तसेच,१८०  ची नवीन मागणी करण्यात आली आहे. Fog safety Device

(हेही वाचा : INS Imphal : आयएनएस इम्फाळ नौदलात होणार दाखल; ब्राम्होस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज)

ही आहेत प्रमुख वैशिष्ठ्ये 

  • जी. पी. एस. कार्यक्षमता-धुके संरक्षण प्रणाली जी. पी. एस. तंत्रज्ञानाद्वारे चालवली जाते. त्यामुळे रेल्वे चालकांना आगामी तीन संकेतांविषयी ऑडिओ आणि व्हिज्युअल संकेतांद्वारे आगाऊ इशारा मिळतो.
  • सिग्नलचे वर्णन आणि अंतराचे प्रदर्शन-हे उपकरण केवळ पुढील सिग्नलचे वर्णन दर्शवत नाही तर इंजिन आणि सिग्नलमधील मध्यवर्ती अंतर देखील दर्शवते. त्यामुळे आगामी बदलांसाठी योग्य तयारी करणे शक्य आहे.
  • सतर्क प्रणाली-सिग्नलची दिशा प्रत्यक्ष स्थितीच्या ५०० मीटर आधी जाहीर करून, ही प्रणाली ट्रेन चालकांना त्यांच्या गाड्या सुरक्षितपणे हाताळण्यासाठी सतर्क करते. चालकाला अधिक सतर्क राहण्यास मदत करते.

ताशी ७५ किमीचा वेग गाठता येणार
धुक्यामुळे दृश्यमानता कमी असताना गाड्यांचा वेग साधारणपणे ३०-६० किमी प्रती तास  असतो. धुके संरक्षण प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे ताशी ७५ किमीचा कमाल वेग गाठता येतो. यामुळे गाड्यांचा विलंब कमी होतो आणि वेळेची पाबंदी वाढते जेणेकरून गाड्यांना विलंब होणार नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.