मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकांवर ‘आधार’

78
मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकांवर आधार काउंटर सुरू करून मध्य रेल्वे डिजिटल इंडिया चळवळीत एक नवीन पाऊल टाकले जात आहे. हे युआयडीएआय (युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया) च्या समन्वयाने केले जात आहे.  प्रशिक्षित रेल्वे कर्मचारी आधार अपडेट काउंटर चालवतील.
भारतीय नागरिक नवीन आधार मिळवण्यासाठी किंवा विद्यमान आधार अपडेट करण्याच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. नवीन आधार नोंदणी आणि अनिवार्य आधार अपडेट (मुलांसाठी बायोमॅट्रिक इ.) सुविधा मोफत उपलब्ध असतील आणि इतर पर्यायी अपडेट जसे की मोबाइल नंबर अपडेट, पत्ता बदलण्यासाठी ५०/- रुपये शुल्क आकारले जाईल.
पुणे स्टेशनवर ही सुविधा दि. १५.८.२०२२ पासून सुरू करण्यात आली आहे.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नागपूर सारख्या इतर प्रमुख स्थानकांवर टप्प्या टप्प्याने ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.