मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; सिग्नल यंत्रणेत बिघाड

दादर स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेने ट्वीट करत ही माहिती दिली आहे. चाकरमान्यांच्या कामावर जाण्याच्या वेळेदरम्यान हा बिघाड झाल्याने, कामावर जाणा-यांचा खोळंबा झाला आहे.

मध्य रेल्वेने ट्वीटरवरुन सिग्नल यंत्रणेसंदर्भातली गोंधळाबाबत माहिती दिली आहे. दादर स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेमध्ये तांत्रिक बिघा़ड झाला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील ट्रेन उशीराने धावत आहेत, असे म्हटले आहे. कर्मचारी आणि अधिकारी हा बिघाड दुरुस्त करण्याचे काम करत असून लवकरच तो दूर केला जाईल, असे मध्य रेल्वेच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

( हेही वाचा: महापालिकेलाच नकोय कर्मचाऱ्यांची ऑनटाईम हजेरी, आधार व्हेरिफाईड फेसियल हजेरी प्रणालीकडे दुर्लक्ष )

सध्या मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्यात आली आहे. परंतु वाहतूक अद्याप पूर्वपदावर आलेली नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here