मध्य रेल्वेची लोकल सेवा बुधवारी (२० सप्टेंबर) दुपारच्या वेळेस विस्कळीत झाली.लोकल उशिराने धावत आहेत. लोकल प्रवासाला होणाऱ्या या विलंबामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे वाहतूक कोलमडली असल्यामुळे प्रवाशांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरु आहे. निदान उत्सव काळात तरी लोकल सेवा सुरळीत सुरु रहावी, अशी अपेक्षा असते. पण बुधवारी(२० सप्टेंबर ) मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे बदलापूरवरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व गाड्या १५ ते २०मिनिटे उशिराने धावत आहेत. तांत्रिक बिघाड असल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ट्रेन उशिराने धावत असल्याची घोषणा करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. बदलापूरवरून अंबरनाथच्या दिशेने १०. ४०ला येणारी ट्रेन ११. ०५ ला आल्याने प्रवाशी संतप्त झाले हाेते.
(हेही वाचा : FASTag : आता प्रवाशांना लवकरच फास्टॅगमधून कापलेली रक्कम परत मिळणार)
मुंबईकरांची लाईफलाइन असलेली लोकलवर मोठ्या संख्येने प्रवाशी अवलंबून आहेत. अशावेळी मुंबईची लोकल सेवा कोलमडली तर नोकरदारांचे चांगलेच हाल होतात. अगदी काही मिनिटांच्या विलंबामुळे सगळ्या दिवसाच वेळापत्रक कोलमडत. मुंबईकरांच दिवसाच वेळापत्रक लोकलच्या वेळेनुसार ठरतं. ठरलेल्या वेळेला लोकल पकडायची. ती ठरलेल्या वेळेत पोहोचणार. कामावरुन निघाल्यानंतरही तसच नियोजन असतं. यात मध्ये सिग्नल यंत्रणा किंवा अन्य कारणांमुळे बिघाड झाला, तर मुंबईकरांचे हाल होतात. मध्य, पश्चिम आणि हार्बर लोकलवर प्रवासी मोठ्या संख्येने अवलंबून आहेत. नोकरीसाठी अगदी कर्जत-कसाऱ्यावरुन मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
हेही पहा –