रेल्वेचा प्रवास होणार अधिक सुखकर! कसा जाणून घ्या…

मेन लाईनवरील वातानुकुलीत उपनगरीय सेवांमध्ये 10 वरून 44 पर्यंत वाढ

135

मध्य रेल्वेने 19.2.2022 पासून सुधारित वेळापत्रकासह मेन लाईनवर 36 अतिरिक्त उपनगरीय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मेल/एक्स्प्रेस गाड्यांच्या सुधारित वेळेनुसार आणि ठाणे ते दिवा दरम्यान 5 वी आणि 6 वी लाईन सुरू करण्याच्या अनुषंगाने उपनगरीय सेवांच्या वेळेत बदल.

सुधारित वेळापत्रकाची ठळक वैशिष्ट्ये

• मेन लाईनवर 36 अतिरिक्त सेवा. मेन लाईनवरील एकूण सेवांची संख्या 858 वरून 894 पर्यंत वाढणार.

• मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एकूण उपनगरीय सेवांची संख्या 1774 वरून 1810 पर्यंत वाढणार

• मेन लाईनवर एकूण वातानुकुलीत उपनगरीय सेवांची संख्या 10 वरून 44 पर्यंत वाढणार म्हणजेच मेन लाईनवर 34 नवीन वातानुकुलीत उपनगरीय सेवा. 44 वातानुकुलीत सेवांपैकी 25 वातानुकुलीत सेवा जलद सेवा म्हणून चालतील म्हणजेच 24 जलद आणि एक अर्ध जलद

• जलद लाईन सेवांची एकूण संख्या 257 वरून 270 पर्यंत वाढणार म्हणजे 13 आणखी जलद लाईन सेवा

• एकूण धीम्या मार्गावरील सेवांची संख्या 601 वरून 624 पर्यंत वाढणार आहे, म्हणजे आणखी 23 धीम्या मार्गावरील सेवा

• 5व्या आणि 6व्या मार्ग कार्यान्वित झाल्यामुळे काही अर्ध-जलद सेवा जलद किंवा धीम्या सेवांमध्ये रूपांतरित करण्यात आल्या.

मेन लाईनवरील 44 वातानुकुलीत उपनगरीय सेवा 3 वातानुकुलीत रेक वापरून चालवल्या जातील.

वातानुकुलीत उपनगरीय सेवांचा तपशील खालीलप्रमाणे

वातानुकुलीत – सेवा (लिंक – 1)

1. C-4 धीमी लोकल कुर्ला येथून 04.46 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 05.16 वाजता पोहोचते

2. K-1 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 05.20 वाजता सुटणारी कल्याणला 06.24 वाजता पोहोचते

3. K-10 जलद लोकल कल्याणहून 06.32 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 07.39 वाजता पोहोचते

4. K-17 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून 07.43 वाजता सुटणारी कल्याणला 08.46 वाजता पोहोचते

5. K-36 जलद लोकल कल्याणहून 08.54 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 09.59 वाजता पोहोचते

6. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून 10.04 वाजता सुटणारी K-35 जलद लोकल 11.07 वाजता कल्याणला पोहोचते

7. DK-8 जलद लोकल कल्याणहून 11.22 वाजता सुटणारी दादरला 12.15 वाजता पोहोचते

8. DBL-3 जलद लोकल दादरहून 12.30 वाजता सुटणारी बदलापूरला 13.39 वाजता पोहोचते

9. BL-36 जलद लोकल बदलापूरहून 13.48 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 15.14 वाजता पोहोचते

10. TL-37 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 15.19 वाजता सुटणारी टिटवाळ्याला 16.39 वाजता पोहोचते

11. TL-50 जलद लोकल टिटवाळा येथून 16.47 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 18.06 वाजता पोहोचते

12. T-109 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 18.10 वाजता सुटणारी ठाण्याला 18.52 वाजता पोहोचते

13. T-124 धीमी लोकल ठाण्याहून 18.57 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 19.55 वाजता पोहोचते

14. K-117 धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून 20.00 वाजता सुटणारी कल्याणला 21.28 वाजता पोहोचते

15. K-130 धीमी लोकल कल्याणहून 21.36 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 23.05 वाजता पोहोचते

16. T-147 धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 23.12 वाजता सुटणारी ठाण्याला 00.07 वाजता पोहोचते

वातानुकुलीत – सेवा (लिंक – 2)

1. T-32 जलद लोकल ठाण्याहून 08.02 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 08.50 वाजता पोहोचते

2. K-27 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 08.56 वाजता सुटणारी कल्याणला 09.58 वाजता पोहोचते

3. DK-6 जलद लोकल कल्याणहून 10.02 वाजता सुटणारी दादरला 10.52 वाजता पोहोचते

4. DBL-1 जलद लोकल दादरहून 11.08 वाजता सुटणारी बदलापूरला 12.21 वाजता पोहोचते

5. BL-32 जलद लोकल बदलापूरहून 12.27 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 13.53 वाजता पोहोचते

6. T-77 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 14.03 वाजता सुटणारी ठाण्याला 14.46 वाजता पोहोचते

7. T-88 जलद लोकल ठाण्याहून 15.03 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 15.45 वाजता पोहोचते

8. K-83 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून 16.10 वाजता सुटणारी कल्याणला 17.18 वाजता पोहोचते

9. K-94 जलद लोकल कल्याणहून 17.27 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 18.30 वाजता पोहोचते

10. K-103 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 18.36 वाजता सुटणारी कल्याणला 19.41 वाजता पोहोचते

11. K-122 धीमी लोकल कल्याणहून 19.56 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 21.28 वाजता पोहोचते

12. K-125 अर्ध जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 21.42 वाजता सुटणारी कल्याणला 23.05 वाजता पोहोचते

13. DK-16 धीमी लोकल कल्याणहून 23.11 वाजता सुटणारी दादरला 00.21 वाजता पोहोचते

14. DT-1 धीमी लोकल दादरहून 00.29 वाजता सुटणारी ठाण्याला 01.05 वाजता पोहोचते

(हेही वाचा -मुंबईकरांचा रेल्वे प्रवास होणार सुखकर! काय आहे विशेष कारण वाचा…)

वातानुकुलीत – सेवा (लिंक – ३)

1. T-24 धीमी लोकल ठाण्याहून 07.04 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 08.00 वाजता पोहोचते

2. T-19 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 08.04 वाजता सुटणारी ठाण्याला 08.46 वाजता पोहोचते

3. T-46 जलद लोकल ठाण्याहून 09.03 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 09.47 वाजता पोहोचते

4. A-15 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 09.51 वाजता सुटणारी अंबरनाथला 11.08 वाजता पोहोचते

5. A-30 धीमी लोकल अंबरनाथहून 11.17 वाजता सुटणारी 13.02 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचते

6. T-71 धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून 13.06 वाजता सुटणारी ठाण्याला 14.06 वाजता पोहोचते

7. T-86 धीमी लोकल ठाण्याहून 14.22 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 15.20 वाजता पोहोचते

8. DL-29 धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 15.24 वाजता सुटणारी डोंबिवलीला 16.43 वाजता पोहोचते

9. DL-36 धीमी लोकल डोंबिवलीहून 16.55 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 18.14 वाजता पोहोचते

10. DL43 धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून 18.18 वाजता सुटणारी डोंबिवलीला 19.37 वाजता पोहोचते

11. DL-48 धीमी लोकल डोंबिवलीहून 19.50 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 21.12 वाजता पोहोचते

12. K-123 धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून 21.16 वाजता सुटणारी कल्याणला 22.45 वाजता पोहोचते

13. K-138 धीमी लोकल कल्याणहून 22.56 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 00.27 वाजता पोहोचते

14. C-3 धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 00.31 वाजता सुटणारी कुर्ला येथे 01.00 वाजता पोहोचते

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.