आधीच मेगाब्लॉक मुळे मेटाकुटीला प्रवाशी आले आहेत. त्यातच ऐन गर्दीच्या वेळी बुधवारी (८ नोव्हेंबर) रोजी सायंकाळी कळवा स्थानकाजवळ ओव्हर हेड वायर तुटल्याने लोकल वाहतुकीवर परिणाम झाल्याची घटना घडली आहे. लोकल विस्कळीत (Mumbai Local Train) झाल्याने रेल्वे स्थानकात गर्दी उसळली आहे. तर मध्य रेल्वेकडून याबाबत कोणतीही माहिती दिली जात नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. (Central Railway Update)
ठाणे आणि कळवा स्थानकाजवळ ओव्हर हेड वायर तुटल्याने लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे.कळवा रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावर पारसिक बोगद्याच्या ठिकाणी ओव्हरहेड वायर तुटली आहे. त्यामुळे कर्जत-कसाराकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील लोकल वाहतूक खोळंबली आहे. दुपारी दोन-अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. परिणामी सायंकाळपर्यंत मध्य रेल्वे विस्कळीत आहे. गोरखपुर एक्सप्रेस आणि बदलापूर लोकल डाऊन फास्ट ट्रॅकवर रखडली आहे. बिघाड दुरुस्तीचे काम अजूनही सुरूच असून त्यामुळे कल्याण दिशेने जाणारी सर्व लोकल एक्सप्रेस स्लो मार्गावरून वळवल्या आहेत.यामुळे जलद मार्गावरील लांब पल्ल्याच्या आणि लोकल ट्रेनला मोठा फटका बसला आहे. ठाण्यावरून लोकल ट्रेन या जवळपास २०ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती आहे.(Central Railway Update)
Join Our WhatsApp Community