मध्य रेल्वे मार्गावर गुरुवार मध्यरात्रीपासून मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून तब्बल ६३ तासांचा हा ब्लॉक असेल. मात्र शुक्रवारी ठाणे रेल्वे स्टेशन हद्दीत हा ब्लॉक असल्याने या दिवशी बहुतांशी गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे, मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. शुक्रवारी शासकीय कार्यालय सुरू असल्याने मुंबई महापालिकेतील कर्मचारी मात्र चिंतेत आहे. एका बाजूला रेल्वे प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच मुंबई महापालिकेच्या वतीने अद्यापही या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना सवलत किंवा संपूर्णपणे सुट्टी जाहीर करण्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्यामुळे मध्य व हार्बर मार्गावर राहणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे. (Central Railway Mega Block)
मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनवरील १०-११ प्लॅटफॉर्म्सच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामासाठी सध्या ब्लॉकची मालिका सुरू आहे. तसेच आता अंतिम कामे करण्यासाठी सीएसएमटी मार्गावर ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म्सचे रुंदीकरण करण्यासाठी ६३ तासांचा ब्लॉक असेल. गुरुवारी (३० मे २०२४) रात्रीपासून ते रविवारी (२ जून २०२४) दुपारपर्यंत ठाण्यातील ब्लॉक सुरू असेल. शुक्रवारी (३१ मे २०२४) रात्रीपासून ते रविवारी (२ जून २०२४) दुपारपर्यंत सीएसएमटी येथे ब्लॉक असेल. या कालावधीत ७४ रेल्वे गाड्या रद्द होणार असून १२२ रेल्वेगाड्या अंशत: रद्द होणार आहेत. यामुळे मध्य रेल्वेवरील सुमारे ३३ लाख प्रवाशांचे हाल होणार आहे. (Central Railway Mega Block)
(हेही वाचा – Pune Porsche Accident : अग्रवालांच्या ‘बाळा’ची आई अडचणीत)
मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शनिवार आणि रविवार सुट्टी असते. आपल्या कामासाठी सुट्टी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कामामुळे सुट्टी घ्यावी लागणार असल्याने हे सर्व महापालिकेचे कर्मचारी चिंतेत आहेत. महापालिका कामावर येण्याच्या तयारीत असताना आम्हाला नाहकपणे सुट्टी घेऊन एक सीएल वाया घालवावी लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे. रेल्वेने मेगा ब्लॉक जाहीर करून काही दिवस झालेले आहेत. आणि शुक्रवारी अनेक गाड्या रद्द होणार असल्यामुळे सकाळी कामावर येणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडेल आणि या गैरसोयीमुळे त्यांना प्रचंड त्रास होईल, याची कल्पना मुंबई महापालिकेला असतानाही महापालिका कर्मचाऱ्याचे हित लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे मार्गावर जाणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला, त्याच धर्तीवर महापालिका प्रशासनाने याबाबत निर्णय घ्यायला हवा अशा प्रकारची मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. मात्र सरसकट सुट्टी जाहीर करणे शक्य नसेल तर मध्ये मार्गावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही सुट्टी देता येईल आणि पश्चिम पश्चिम उपनगर युवा पश्चिम उपनद्याच्या मार्गावर जाणारे कर्मचारी आणि सहल भागातील कर्मचारी हे कामावर येऊ शकतील अशा प्रकारचे परिपत्रक निघणे आवश्यक आहे, अशी कर्मचाऱ्यांची भावना आहे. (Central Railway Mega Block)
अनेक गाड्या रद्द होणार असल्याने कमी गाड्यांमुळे प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेता प्रशासनाने याबाबतचे परिपत्रक त्वरित जाहीर करणे आवश्यक आहे. दरम्यान, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यामनी महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यात त्यांनी आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सुट्टी दिल्याची माहिती मिळत आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त काय निर्देश सामान्य प्रशासन विभागाला देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Central Railway Mega Block)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=bLq3dU-9gOw
Join Our WhatsApp Community