रेल्वे रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेवर रविवार 3 डिसेंबर रोजी (Central Railway Megablock) ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा-मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांनुसार डाऊन धीम्या मार्गावर चालवण्यात येऊन ठाणे पुढे जाणाऱ्या जलद गाड्या पुन्हा डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील आणि आपल्या गंतव्यस्थानी १५ मिनिटे उशीराने पोहोचतील.
ठाणे येथून अप जलद मार्गावरील (Central Railway Megablock) सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत सुटणाऱ्या सेवा मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार चालवण्यात येतील व अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील त्यामुळे या सेवा निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
(हेही वाचा – President Droupadi Murmu: नव्या वाटा शोधण्यासाठी ‘एआय’ ची गरज)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि
चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Central Railway Megablock) येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या आणि वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत बंद राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी (Central Railway Megablock) सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जातील. (Central Railway Megablock)
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community