मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. मध्य रेल्वेवर घेण्यातआलेला ६३ तासांचा जम्बोब्लॉक २ जून म्हणजेच रविवारी दुपारपर्यंत संपणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. मात्र, जम्बोब्लॉक संपल्यानंतरही लोकल ट्रेन भायखळा आणि वडाळा स्टेशनपर्यंतच धावणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. (Central Railway Megablock)
मध्य रेल्वेवरील सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) आणि ठाणे स्थानकांतील अत्यावश्यक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. यासाठी ठाण्यात ६३ तास आणि सीएसएमटी येथे ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकदरम्यान अनेक लोकल ट्रेन रद्द केल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. (Central Railway Megablock)
(हेही वाचा – Transport Department च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदोन्नती व बदली होणार)
प्रवाशांची तारांबळ
Shri Ram Karan Yadav, @GM_CRly, visited Thane Station to inspect the progress of the Platform 5/6 widening work.
He conducted a thorough review of the completed work and motivated the workforce.
Post Inspection, Shri Yadav interacted with the media. @RailMinIndia pic.twitter.com/x3QWSxbRM3— Central Railway (@Central_Railway) June 1, 2024
रेल्वे प्रशासनाने लवकरात लवकर कामे आटोपून लोकलसेवा सुरळीत करावी, अशी विनंती प्रवासी करत आहेत. प्रवाशांची तारांबळ बघता प्रशासनानेदेखील ब्लॉककाळात नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. सीएसएमटी आणि ठाणे स्टेशनवरील सुरू असलेली कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. (Central Railway Megablock)
३१ रेल्वेगाड्या रद्द आणि ८० रेल्वेगाड्या अंशत: रद्द
रविवारी दुपारी १२.३० वाजता सीएसएमटी येथील ३६ तासांचा ब्लॉक आणि ठाणे येथील ६३ तासांचा ब्लॉक दुपारी ३.३० वाजता संपणार आहे, मात्र सीएसएमटीच्या ब्लॉकमुळे रविवारीही लोकल भायखळा, परळ, दादर आणि वडाळ्यापर्यंत धावणार आहेत. त्यामुळे रविवारीदेखील मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. रविवारी लोकल ट्रेनच्या २३५ फेऱ्या आणि २७० लोकल अंशत: रद्द असतील. त्याचप्रमाणे ३१ रेल्वेगाड्या रद्द आणि ८० रेल्वेगाड्या अंशत: रद्द असतील याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलंय.
हेही पहा –