Central Railway: मध्य रेल्वेवर रात्रकालिन ‘ब्लॉक’, ‘या’ लोकल गाड्या रद्द होणार

ब्लॉकपूर्वीची सीएसएमटी येथून कर्जतसाठी शेवटची लोकल सीएसएमटी येथून रात्री ११.३० वाजता सुटेल.

173
Central Railway: मध्य रेल्वेवर रात्रकालिन 'ब्लॉक', 'या' लोकल गाड्या रद्द होणार
Central Railway: मध्य रेल्वेवर रात्रकालिन 'ब्लॉक', 'या' लोकल गाड्या रद्द होणार

मध्य रेल्वेवरील (Central Railway) उल्हासनगर स्थानकाजवळील पादचारी पुलावर तुळया टाकण्यासाठी कल्याण-अंबरनाथ विभागात अप आणि डाऊन मार्गावर शनिवारी रात्री १:२० वाजल्यापासून ते रात्री ३:२० वाजेपर्यंत म्हणजे एकूण २ तास रात्रीचा विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल गाड्या रद्द होणार आहेत.

वाहतूक ब्लॉकमुळे रात्री ११:५१ वाजताची सीएसएमटी-अंबरनाथ लोकल आणि अंबरनाथ येथून रात्री १०.०१ आणि रात्री १०.१५ वाजताची सीएसएमटीसाठी जाणारी लोकल रद्द करण्यात येणार आहे. सीएसएमटी रात्री १२.०४ वाजता अंबरनाथसाठी सुटणारी लोकल कुर्ला येथे टर्मिनेट करण्यात येईल. सीएसएमटी येथून १२.२४ वाजता कर्जतसाठी सुटणारी लोकल ठाण्यापर्यंत चालवण्यात येईल. कर्जत येथून रात्री ०२.३३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी लोकल ठाणे येथून पहाटे ४.०४ वाजता सुटेल.

(हेही वाचा – First QR Code Chowk: गिरगावात पहिला क्यू आर कोड चौक, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन )

ब्लॉकपूर्वीची सीएसएमटी येथून कर्जतसाठी शेवटची लोकल सीएसएमटी येथून रात्री ११.३० वाजता सुटेल. खोपोली येथून सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल, खोपोली येथून रात्री १०.१५ वाजता सुटेल. सीएसएमटी येथून ब्लॉकनंतर कर्जतकरिता पहिली लोकल सीएसएमटी येथून पहाटे४.४७ वाजता सुटेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.