UTS App मध्ये रेल्वे करणार ‘हा’ बदल! तिकीट, पास काढताना प्रवाशांना होणार मोठा फायदा

भारतीय रेल्वेच्या UTS App मुळे प्रवाशांना रेल्वेचे तिकीट, पास काढणे अतिशय सोपे झाले आहे. त्यामुळे यूटीएस अॅप वापरणा-या युजर्सची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. पण UTS app वरुन स्टेशनपासून एका ठराविक अंतराच्या आत असतानाच तिकीट किंवा पास काढता येतो. पण आता याचबाबत रेल्वेकडून अॅपमध्ये बदल करण्याचा विचार करण्यात येत आहे. या बदलामुळे प्रवाशांना कुठूनही रेल्वेचे तिकीट काढणे शक्य होणार आहे.

app मध्ये सुधारणा करण्याबाबत विचार

Unreserved Ticketing System(UTS)app मध्ये बदल करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने याबाबत प्रशासकीय पातळीवर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईचे नवीन विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी सेंटर ऑफ रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (CRIS) सोबत प्राथमिक बैठक घेत लोकल ट्रेनच्या UTS app मध्ये सुधारणा करण्याबाबत चर्चा केली आहे.

(हेही वाचाः RBI कडून FD च्या नियमांत मोठा बदल, ‘हे’ न केल्यास मिळणार कमी व्याज)

निर्बंध हटवण्यासाठी प्रयत्न

geo-fencing restriction मुळे सध्या रेल्वे ट्रॅकपासून 30 मीटर लांब आणि रेल्वे स्टेशनपासून 2 किमी. च्या हद्दीत असतानाच UTS app मधून तिकीट काढता येते. पण यामुळे अनेकदा प्रवाशांची गैरसोय होते. तिकीट तपासनीस दिसल्यानंतर प्रवाशांनी या अॅपमधून तिकीट काढू नये म्हणून रेल्वेकडून हे निर्बंध घालण्यात आले आहेत. पण या निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here