मध्य रेल्वेने काही दिवसांपूर्वीच ३५० हून अधिक संस्था, कार्यालये आणि व्यावसायिक मंडळांना पत्र पाठवून त्यांच्या कार्यालयाच्या वेळा बदलण्याचे आवाहन केले होते. प्रवाशांची वाढलेली गर्दी आटोक्यात राहावी याकरिता आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्याची मागणी (flexible working hours) मध्य रेल्वे या पत्राद्वारे विविध संस्था, कार्यालये आणि व्यावसायिक मंडळांना केली होती. या पत्राद्वारे रेल्वेकडून कार्यालयीन कामाच्या वेळेत बदल करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
मध्य रेल्वेच्या (Central Railway) या आवाहनाला ६ संघटनांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या संघटनांनी त्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे मान्य केले असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. यामध्ये टपाल विभाग, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी), ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज, बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे. यामुळे गर्दीच्या वेळी कर्मचाऱ्यांना एकाच वेळी ट्रेनने प्रवास करण्यापासून रोखण्यात आले आहे. त्यामुळे उपनगरीय रेल्वेवरील वाढता ताण कमी होण्यास मदत होईल, असेही मतही रेल्वेने व्यक्त केले आहे.
(हेही वाचा – Football Coach Punches Referee : ‘या’ क्लबच्या व्यवस्थापकाने फुटबॉल रेफरीलाच लगावला ठोसा )
कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे फायदे
– मध्य रेल्वेने या प्रवासाचे फायदेही सांगितले आहेत. वेळेचे नियोजन केल्यामुळे गर्दीमुळे प्रवाशांचा गोंधळ उडतो, प्रवाशांना ताण येतो. यासारख्या समस्यांना आळा बसेल. प्रवाशांना विशेषत: नोकरी करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी, ताणतणावविरहित आणि अधिक सहजतेने होईल. प्रवास आनंदाने झाला तर कामावरही याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. याशिवाय अति गर्दीमुळे होणारी धक्काबुक्की, ढकलणे, पडणे यासारख्या समस्याही उद्भवणार नाहीत. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर, स्थानकाच्या जिन्यांवर आणि एक्सलेटर आणि गाड्यांमध्येही गर्दीमुळे होणाऱ्या संभाव्य हानीचा टाळता येईल.
– कामाच्या वेळेत बदल झाला तर प्रवाशांची वाढती गर्दी आटोक्यात राहिल शिवाय यामुळे रेल्वेगाडीतून लटकणे, पडणे यामुळे होणारे अपघात आणि मृत्यूही टाळता येऊ शकतात. रेल्वेचा प्रवास सुरक्षितरित्या होऊ शकतो. यामुळे रेल्वे अपघात टाळण्याच्या दिशेने उचलेले हे सकारात्मक पाऊल ठरेल.
– सुरक्षित प्रवासामुळे मानसिक ताण कमी होण्यासही मदत मिळेल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community