भारतीय रेल्वेच्या कोणत्याही झोनपेक्षा आतापर्यंतची सर्वाधिक तिकीट तपासणीतील उत्पन्नाची नोंद झाली आहे. ३६.२८ लाख प्रकरणांमधून २३८.७२ कोटींचा दंड वसूल केला.
एप्रिल-डिसेंबर २०२२-२०२३ मधील भारतीय रेल्वेमध्ये सर्वाधिक मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२२-२३ (एप्रिल-डिसेंबर) मध्ये विनातिकीट/अनधिकृत प्रवासाची ३६.२८ लाख प्रकरणे शोधून काढली. २०२१-२०२२ मध्ये याच कालावधीत १४६.०४ कोटी प्राप्त झाले होते.
सर्व बोनाफाईड रेल्वे वापरकर्त्यांना आरामदायी प्रवास आणि उत्तम सेवा सुनिश्चित करण्यासाठी, मध्य रेल्वे विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय, मेल एक्सप्रेस, प्रवासी सेवा, विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करते. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी मध्य रेल्वे प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन करीत आहे.