मुंबई मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! ५९६ जागा रिक्त; ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

135

रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) अंतर्गत मध्य रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवार मध्य रेल्वे भरती २०२२ साठी २८ नोव्हेंबरपर्यंत अधिकृत वेबसाईट rrccr.com वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

( हेही वाचा : …अन् विराट कोहली संतापला! पर्सनल रुमचा व्हिडिओ व्हायरल; हॉटेलचा माफिनामा, नेमके घडले तरी काय? )

मध्य रेल्वे भरती

मध्य रेल्वे भरती अंतर्गत स्टेनोग्राफरची ८ पदे, वरिष्ठ व्यावसायिक/ तिकीट लिपिकाची १५४ पदे, गुड्स गार्डची ४६ पदे, स्टेशन मास्टरची ७५ पदे, कनिष्ठ लेखा सहायक १५० पदे, कनिष्ठ व्यावसायिकासह तिकीट लिपिकाची १२६ पदे आणि अकाऊंट क्लर्कसाठी ३७ रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. रेल्वेतील या पदांसाठी निवड लेखी चाचणी, कौशल्य चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे केली जाईल. परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुणांचे नकारात्मक गुण असतील.

येथे अर्ज करा

पात्र उमेदवार २८ नोव्हेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी अधिकृत वेबसाइट rrccr.com द्वारे मध्य रेल्वे भरती 2022 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचनेद्वारे त्यांची पात्रता तपासावी.

कोण अर्ज करू शकतो?

  • स्टेनोग्राफर – १२वी उत्तीर्ण उमेदवार, शॉर्टहॅंड स्पीड 80 wpm
  • वरिष्ठ व्यावसायिक/तिकीट क्लर्क – पदवी
  • गुड्स गार्ड – पदवी
  • स्टेशन मास्तर – पदवी
  • कनिष्ठ व्यावसायिक/तिकीट क्लर्क – १२ वी
  • अकाऊंट्स क्लर्क – १२ वी
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.