कोरोना महामारीमुळे राज्यात सर्वत्र लॉकडाऊन लावला होता. लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्या बंद करण्यात आल्या होत्या, त्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या काही फेऱ्या सुरु केल्या होत्या. परंतु रेल्वे स्थानकांत अनावश्यक गर्दी होऊ नये म्हणून प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर १० रुपयांवरून ५० रुपये केले होते. आता हे दर पूर्ववत करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
मार्च २०२० पासून तिकीट दर वाढलेले
या निर्णयाविषयी रेल्वेने स्वतः माहिती दिली. याची अंमलबजावणी सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकात गुरुवार, २५ नोव्हेंबरपासून केली जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रेल्वे स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी मार्च २०२० पासून मुंबईतील काही महत्त्वाच्या फलाट तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. तो दर आता पूर्ववत केल्याचे सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community