मोठी बातमी! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

161

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बुधवारी पहाटे लातूर- मुंबई एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये काही बिघाड झाल्याने ही वाहतूक विस्कळीत झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. बदलापूर- अंबरनाथच्या दरम्यान या एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी मुंबईकरांचा मात्र खोळंबा झाला आहे. अनेक लोकल गाड्या सकाळी सात वाजल्यापासून बदलापूर स्थानकात खोळंबल्या आहेत.

इंजिन फेल झाल्यामुळे रेल्वे जागच्या जागेवर थांबली. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लोकल गाड्यांवर याचा परिणाम झाला. कर्जत ते कल्याण सेवेवरही याचा परिणाम झाला आहे.

( हेही वाचा :आता पेट्रोलनंतर डिझेलनेही ओलांडला शंभर रुपयांचा टप्पा )

वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु

विशेष म्हणजे, ऐन सकाळी नोकरदार वर्ग कार्यालयाला जाण्यासाठी निघालेले असतात. त्यामुळे सकाळी मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकांवर गर्दी असते. अशातच रेल्वे एक्स्प्रेसचे इंजिन फेल झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर एकच गर्दी पाहण्यास मिळाली. कल्याण रेल्वे स्थानकावरून दुसरे इंजिन मागवण्यात आले असून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.