मध्य रेल्वेने तिकीट तपासणीतून १००.८२ कोटी रुपये महसुलाची बचत केली आहे. मध्य रेल्वेत १ एप्रिल ते ६ नोव्हेंबर- २०२१ या कालावधीत अनियमित प्रवासाची १७.२२ लाख प्रकरणे आढळून आली आहेत. तसेच, मध्य रेल्वेच्या स्पेशल टीमने २९,०१९ व्यक्तींना कोविड-१९ योग्य वर्तन न पाळल्याबद्दल शोधून त्यांना दंड ठोठावला आहे. मध्य रेल्वेने कोविड-१९ प्रोटोकॉलचे पालन करताना सरकारच्या निर्देशांनुसार आणि प्रवाशांना प्रवास करताना सर्व खबरदारी घेण्यास संवेदनशील बनवताना, चुकीचे वर्तन करणाऱ्या प्रवाशाला दंड करण्यात अतिशय तत्पर आणि कुशलतेने काम केले आहे, ज्यामुळे रेल्वेचा मोठा महसूल तोटा वाचला आहे.
असा केला दंड वसूल
उत्पन्नाच्या बाबतीत भुसावळ विभागाची विक्रमी ₹ ३३.७४ कोटी महसुली बचत झाली आहे. , त्यानंतर मुंबई विभाग ₹ ३३.२० कोटी, नागपूर विभाग ₹ १६.७३ कोटी आणि सोलापूर, पुणे विभाग आणि मुख्यालये ₹ १७.१५ कोटी प्राप्त झाले आहेत. प्रकरणांच्या (cases) बाबतीत, मुंबई विभागात ६.८३ लाख प्रकरणे, त्यानंतर भुसावळ विभाग ४.६८ लाख प्रकरणे, नागपूर विभाग २.५१ लाख प्रकरणे आणि सोलापूर, पुणे विभाग ३.२० लाख प्रकरणे यांचा क्रमांक लागतो. दिनांक १.४.२०२१ ते ६.११.२०२१ या कालावधीत, तिकीट तपासणी कर्मचार्यांच्या विशेष पथकांनी कोविड-१९ योग्य वर्तनाचे पालन न केल्याची एकूण २९,०१९ प्रकरणे शोधून त्यांना दंड ठोठावला. मुखपट्टी/फेस कव्हर न घातलेल्या प्रवाशांची एकूण २३,८१६ प्रकरणे आणि कोविड-१९ मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रवास करण्यास परवानगी नसलेल्या प्रवाशांची ५,२०३ प्रकरणे आढळून आली आणि त्यांच्याकडून अनुक्रमे रु.३९.६८ लाख आणि रु. २६.०२ लाख दंड वसूल करण्यात आला.
(हेही वाचा – मोदी सरकारचा मोठा निर्णय! ‘ईडी’, ‘सीबीआय’ प्रमुखांचा कार्यकाळ वाढवला)
बोनफाईड रेल्वे वापरकर्त्यांना चांगली सेवा देण्याच्या आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्याच्या प्रयत्नात मध्य रेल्वेने नियमितपणे उपनगरीय आणि उपनगरीय / मेल एक्सप्रेस विशेष गाड्यांमध्ये विनातिकीट आणि अनियमित प्रवासाविरुद्ध सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि कोविड-१९ च्या अनुषंगाने सखोल मोहीम राबवली आहे. आपले कर्तव्य बजावत असताना मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचार्यांच्या वागणुकीमुळे तक्रारी कमी झाल्या आहेत. त्यांनी अनेक प्रसंगी हरवलेल्या मुलांना त्यांच्या पालकांसोबत एकत्रीत भेट करवून त्यांची सहृदयी बाजू देखील प्रदर्शित केली आहे.
Join Our WhatsApp Community