प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेच्या ‘या’ स्थानकांदरम्यान सलग दोन दिवस मेगाब्लॉक; पहा संपूर्ण वेळापत्रक

148

कर्जत स्थानकावर बूम पोर्टलच्या उभारणीसाठी मध्य रेल्वेकडून मुंबई विभागात विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक असणार आहे.

( हेही वाचा : चैत्यभूमीवर खाद्यपदार्थांचे वाटप करायचे असेल, तर रविवारपर्यंत करा महापालिका आणि पोलिसांकडे नोंदणी)

या विशेष ब्लॉकचा तपशील खालीलप्रमाणे आहे…

दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी ब्लॉक 1 –

सकाळी १०.४५ ते दुपारी १२.१५ (९० मिनिटे) भिवपुरी रोड ते पळसधरी पर्यंत सर्व मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे.

उपनगरीय गाड्यांच्या चालण्याच्या पद्धती

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ०९.०१, ०९.३० आणि ०९.५७ वाजता सुटणाऱ्या कर्जत लोकल नेरळपर्यंत धावतील.
  • कर्जत येथून सकाळी १०.४५ , ११.१९, दुपारी १२.०० वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल कर्जत ऐवजी नेरळ येथून चालविण्यात येतील.
  • कर्जत येथून सकाळी १०.४० आणि दुपारी १२.०० वाजता सुटणारी खोपोली लोकल रद्द राहणार आहे.
  • खोपोली येथून सकाळी ११.२० आणि दुपारी १२.४० वाजता सुटणारी कर्जत लोकल रद्द राहणार आहे.

खालील एक्सप्रेस गाड्या लोणावळा, पळसधरी येथे नियमित केल्या जातील आणि गंतव्यस्थानी वेळापत्रकापेक्षा उशिराने पोहोचतील

  • ट्रेन क्रमांक 22731 हैदराबाद – मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक 16587 यशवंतपूर – बिकानेर एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक 11014 कोईम्बतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी ब्लॉक 2 –

रविवारी ११.२० ते दुपारी १२.२० वाजेपर्यंत भिवपुरी रोड ते पळसधरी पर्यंत सर्व मार्गांवर मेगाब्लॉक

उपनगरीय गाड्यांच्या चालण्याच्या पद्धती

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ०९.३० आणि ०९.५७ वाजता सुटणाऱ्या कर्जत लोकल नेरळपर्यंत चालविण्यात येतील.
  • कर्जत येथून सकाळी ११.१९ आणि दुपारी १२.०० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल कर्जत ऐवजी नेरळ येथून चालविण्यात येतील.
  • कर्जत येथून दुपारी १२.०० वाजता सुटणारी खोपोली लोकल आणि
  • खोपोली येथून सकाळी ११.२० वाजता सुटणारी कर्जत लोकल रद्द राहतील.
  • 11014 कोईम्बतूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍सप्रेस नियोजित वेळेपेक्षा उशिराने पोहोचेल
  • ब्लॉक कालावधीत नेरळ ते खोपोली दरम्यान कोणतीही उपनगरी सेवा उपलब्ध असणार नाही.
  • या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.