‘ठाकरे’ सरकार हिरवा कंदील देईना, लोकल सुरु होईना

98

लॉकडाऊनमुळे मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली लोकल सर्व सामान्यांसाठी मागील पाच महिन्यांपासून बंद आहे. लोकल बंद असल्याने अनेकांना कामावर जाता येत नाही. यामुळेच राज्य सरकारने लोकल लवकरात लवकर लोकल सुरु करावी अशी मागणी जोर धरू लागली असतानाच राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्यास मुंबईत लोकल वाहतूक सुरु करण्यासाठी तयार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे डीआरएम शलभ गोयल यांनी दिली आहे. मध्य रेल्वे सुरु करण्याबाबत आम्ही राज्य सरकारवर अवलंबून आहोत ‘राज्य सरकारने मागणी केल्यास लोकल त्वरित सुरु करू’, असे मध्य रेल्वेचे डीएमआर गोयल म्हणालेत. या सोबतच कोरोनाच्या संवेदनशील परिस्थितीत रेल्वेवरील गर्दीचा भार कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळेत बदल करण्याची मागणीही मध्य रेल्वेकडून केली जात आहे.

मुख्यमंत्री म्हणाले घाईगडबडीत निर्णय नाहीच

दरम्यान लोकल सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोध असून, नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत त्यांनी लोकल सुरु करण्याला विरोध दर्शवला आहे. जगभरात ज्या काही गोष्टी घाईगडबडीत केल्या असतील त्या गोष्टी महाराष्ट्र करणार नाही, आपण ज्या ज्या गोष्टी सुरु केल्या आहेत, त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊन आपण या गोष्टी सुरु केल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत एखादी गोष्ट सुरू किंवा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र घेणार नाही, असे उध्दव ठाकरे म्हणाले आहेत. याचाच अर्थ मुंबईमध्ये लोकल सुरू होण्यासाठी आणखीन काही काळ वाट बघावी लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.