Central Railway: मध्य रेल्वेची ‘या’ स्थानकांदरम्यान वाहतूक विस्कळीत

148

मध्य रेल्वेची कसारा ते आसनगावापर्यंत वाहतूक विस्कळीत झाली आहे. (Central Railway issue) दुरंतो एक्सप्रेसचे ( Duronto Express) इंजिन तासाभरापूर्वी खर्डीजवळ फेल झाल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. सध्या दुसरे इंजिन युद्ध पातळीवर जोडण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरु आहे. त्यामुळे कसारा ते आसनगावपर्यंतच्या लोकल वाहतुकीला फटका बसला आहे.

( हेही वाचा: धनू भाऊ, चाराण्याचे चणे खाऊ… )

मिळालेल्या माहितीनुसार, कसारा ते आसनगाव अप मार्गावर दुरंतो एक्सप्रेसचे इंजिन खर्डीजवळ फेल झाले. अप मार्गावर ही समस्या निर्माण झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून इंजिन बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. आसनगावापासून पुढची वाहतूक सुरळीत सुरु आहे. मात्र कसारा ते आसनगाव दरम्यानची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

सकाळच्या वेळी नोकरदार वर्ग मुंबईच्या दिशेने रवाना होत असतात. कसारा आणि आसनगावदरम्यानची वाहतूक विस्कळीत झाल्याने, सकाळीच चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. कसारा पासून पुढची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कार्यालयात पोहोचायला चाकरमान्यांना उशीर होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.