Central Railway: मध्य रेल्वेची लोकल पुन्हा खोळंबली! ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली

318
Central Railway: मध्य रेल्वेची लोकल पुन्हा खोळंबली! ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली
Central Railway: मध्य रेल्वेची लोकल पुन्हा खोळंबली! ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली

मध्यरेल्वेची लोकल लाइन पुन्हा विस्कळीत झाली आहे. ठाकुर्ली ते कल्याण दरम्यान ओव्हर हेड वायर तुटली असल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर (Overhead wire) तुटून ट्रॅकवर पडल्याने मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज आला आणि लोकल जागच्या जागी थांबल्याची घटना सोमवारी (०५ ऑगस्ट) डोंबिवली ठाकुर्ली रेल्वे मार्गावर (Dombivli Thakurli Railway Line) घडली. दुपारी पावणे तीनच्या सुमारास हा अपघात झाला, सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Central Railway)

(हेही वाचा – निवडणूक बदनाम करण्याचा प्रयत्न: Election Commission चे काँग्रेसच्या आरोपांना उत्तर)

मध्य रेल्वे मार्गावर पहिल्याच दिवशी खोळंबा 

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या मनस्तापाला सामोरे जावं लागचं आहे. ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कर्जत आणि कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई ट्रेन अपडेट्स या ग्रुपने ही माहिती दिली आहे. ओव्हरहेड वायर (Overhead Wire) तुटल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच वाहतूक सुरळीत होईल रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.