आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने सर्वत्र गोंधळ उडाला आहे. बदलापूर ते अंबरनाथ या दरम्यान सेवा विस्कळीत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मालगाडी इंजिनमध्ये टेक्निकल बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे.
सोमवारी (२६ जून) सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी बदलापूर आणि अंबरनाथ दरम्यान अप मार्गावर मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला. त्यामुळे त्याच्यामागे असलेल्या लोकल अडकल्या. यामुळे अप मार्गावरील लोकल सेवा आणि मेल एक्सप्रेस सेवांची वाहतूक कर्जत ते बदलापूरच्या दरम्यान पूर्णपणे ठप्प झाली.
UP Badlapur-Ambarnath section-
A goods train stalled at 8.40 hrs.UP Suburban local trains & UP mail express traffic affected between UP Karjat-Badlapur section.
Assisting engine sent to Badlapur to clear stalled goods train.
Inconvenience caused to passengers is regretted
— Central Railway (@Central_Railway) June 26, 2023
(हेही वाचा – राज्यात पावसाचा जोर वाढला तर; हिमाचल प्रदेशात ‘ढगफुटी’ आणि उत्तराखंडमध्ये ‘भूस्खलाने’ नागरिक हैराण)
विस्कळीत झालेली सेवा पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाकडून एक पर्यायी इंजिन बदलापूरकडे पाठवले आहे. तसेच कल्याणवरुन दुसरे इंजिन मागवले असून मालगाडीला सायडिंग करण्याचा मध्य रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे. सकाळी कामावर जाण्याच्या वेळेत ही घटना घडल्याने बदलापूर रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
विस्कळीत झालेली सेवा पूर्ववत होण्यास किती वेळ लागेल याची माहिती नसल्याने पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतीही लोकल मुंबईच्या दिशेने जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community