मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मस्जिद बंदर रेल्वे स्थानकांदरम्यानचा १५४ वर्षे जुना कर्नाक रोड ओव्हर ब्रिज नुकताच पाडला. कर्नाक स्टील स्ट्रक्चर ब्रिज १८६८ मध्ये बांधण्यात आला. पुलाची लांबी ५० मीटर आणि रुंदी १८.८ मीटर होती आणि त्याला ७ स्पॅन होते. पुलाचे अंदाजे वजन ४५० टन होते.
( हेही वाचा : मध्य रेल्वेच्या तिजोरीत २८३ कोटींची भर; काय आहे कारण?)
पुलाच्या दोन्ही टोकांना पुलाचे नाव आणि बांधकामाचे वर्ष लिहिलेले बेसाल्ट दगड होते. शिलालेख असलेले असे ६ शीळा (दगड) होते. १८५८ च्या शिलालेखांमुळे पुलाचे बांधकाम त्या वर्षी सुरू झाले असावे अशी माहिती मिळते. मध्य रेल्वेने या ६ शीळा (दगड) पी. डी’मेलो रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (पूर्व प्रवेश) येथील हेरिटेज गल्ली येथे जतन करण्याचे ठरवले आहे.
Join Our WhatsApp Community