मध्य रेल्वे मार्गावर दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी टाटा मॅरेथॉन 2023 च्या सहभागी होण्याऱ्या नागरिकांकरता विशेष उपनगरीय गाड्या चालवण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : कोरोना काळात अहोरात्र काम केलेले कंत्राटी कामगार आता वाऱ्यावर)
मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या विशेष गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे…
मेन लाईन
विशेष गाडी कल्याण येथून ०३.०० वाजता सुटेल आणि ०४.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल.
हार्बर लाइन
विशेष ट्रेन पनवेल येथून ०३.१० वाजता सुटेल आणि ०४.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. या विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.
पश्चिम रेल्वेमार्गावरही विशेष गाड्या
१५ जानेवारीला मुंबईत होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वे सकाळी विरार ते चर्चगेट तसेच चर्चगेट ते वांद्रे या दरम्यान २ अतिरिक्त धीम्या गाड्या चालवण्यात येणार आहेत.