ठाणे- दिवा या दरम्यान पाचव्या सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी मध्य रेल्वेर मेगाब्लाॅक घेण्यात आले होते. नुकताच 72 तासांचा मेगाब्लाॅक मध्य रेल्वेवर घेण्यात आला होता. याआधी असे मेगाब्लाॅक घेऊन पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेची कामे मार्गी लावण्यात आली होती. पण, अजून काही किरकोळ कामे बाकी असल्याने, मध्य रेल्वेर आणखी पाच मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची मात्र डोकेदुखी कायम राहणार आहे.
…म्हणून घेण्यात येणार ब्लाॅक
आताच 72 तासांचा मेगाब्लाॅक घेत, ठाणे ते दिवा दरम्यान असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यात आले होते. पण आता या मार्गिकांवरील काही किरकोळ कामे बाकी असल्याने, पुन्हा मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. हे ब्लाॅक आठ ते बारा तासांसाठी घेण्यात येणार आहेत. ब्लाॅक शनिवारी आणि रविवारी घेण्यात येणार आहेत. जलद लोकलसाठी आणि मेल, तसेच एक्सप्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध असल्याने, ब्लाॅककाळात लोकल फे-या, एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर कमी परिणाम होणार आहे.
( हेही वाचा: हॉटेल मालकांसाठी खूशखबर! वाचा ‘ही’ आनंदाची बातमी )
पाच मेगाब्लाॅक
ठाणे ते दिवा दरम्यान, मेल तसेच एक्सप्रेससाठी पाचवी आणि सहावी मार्गिका उपलब्ध नसल्याने, जलद लोकलच्या दोन मार्गिकांवरुनच या गाड्या धावत होत्या. त्यामुळे एक्सप्रेस गाड्यांबरोबरच लोकलच्या वेळापत्रकावरही परिणाम होत होता. या पट्ट्यात गेल्या पाच वर्षांपासून उभारण्यात येणा-या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेला अंतिम स्वरुप देण्यासाठी डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंत 12 तास, 18 तास, 24 तास, 36 तास, 14 तास, आणि 72 तासांचे मोठे मेगाब्लाॅक घेण्यात आले. शेवटचा ब्लाॅक झाल्यानंतर, मार्गिका सेवेत आली. यानंतरही याच मार्गिकेच्या कामांसाठी आठ ते बारा तासांचे पाच मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community