रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, ट्रान्स हार्बरही बंद असणार! 

लोकल गाड्यांची आणि रेल्वे रुळांची देखभाल करण्यासाठी दर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जातो, त्यानुसार ३ ऑक्टोबर, रोजी रविवारीही मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या दिवशी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक कार्यान्वित करणार आहे. विशेष म्हणजे यावेळी ट्रान्स हार्बर लाइनही बंद असणार आहे.

मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक असा असेल! 

मुलुंड येथून सकाळी १०.४३ ते दुपारी ०३.४६ पर्यंत सुटणारी डाउन मार्गावरील धिमी/अर्धजलद लोकल सेवा मुलुंड आणि दिवा स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येईल. तर ठाणे, दिवा स्थानकांवर थांबतील आणि वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील. कल्याण येथून सकाळी १०.३७ ते दुपारी ०३.४१ पर्यंत सुटणाऱ्या अप धिमी/अर्धजलद सेवा दिवा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविल्या जाऊन दिवा आणि ठाणे स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने नियोजित स्थळी पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.०० ते संध्याकाळी ०५.०० दरम्यान सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाउन धीम्या सेवांचे वेळापत्रकापेक्षा १० मिनिटे उशिराने आगमन होतील/सुटतील.

(हेही वाचा : सी.आर.झेड कायद्यात केलेल्या बदलांमुळे कोळीवाडे होणार उद्ध्वस्त!)

हार्बर मार्गावरील सेवा बंद 

पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ०४.०५ पर्यंत पनवेल येथून सकाळी १०.४९ ते सायंकाळी ०४.०१ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ०३.१६ या वेळेत पनवेल/बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ट्रान्सहार्बरवरही परिणाम 

तसेच पनवेल येथून सकाळी ०९.०१ ते दुपारी ०३.५३ पर्यंत ठाण्याकरिता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ०३.२० या वेळेत पनवेलच्या दिशेने जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. नेरूळ येथून सकाळी १०.१५ ते दुपारी ०२.४५ या वेळेत खारकोपरला जाणारी डाउन मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.४५ ते दुपारी ०३.१५ या वेळेत नेरूळसाठी खारकोपर सुटणारी अप मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी विभागात विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधी दरम्यान ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here