मध्य रेल्वेचा अनोखा उपक्रम; AC Local Task Force द्वारे तक्रारींचे १०० टक्के निराकरण होणार

53
AC Local Task Force : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि आरामाला प्राधान्य देऊन प्रवासाचा अनुभव सुधारण्यासाठी एक धाडसी आणि निर्णायक पाऊल उचलले आहे. तसेच, अनियमित प्रवास रोखण्यासाठी आणि वातानुकूलित लोकल (AC Local) प्रवाशांचे दर्जा राखण्यासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. (AC Local Task Force)

(हेही वाचा – Farmers Protest : ७०० शेतकरी आंदोलकांना अटक; पंजाबमधील आप सरकारची आंदोलकांवर कारवाई)

दिनांक २५ मे २०२४ रोजी, मध्य रेल्वेने उपनगरीय गाड्यांमधील अनियमित प्रवासाशी संबंधित समस्या (Travel related issues) सोडवण्यासाठी एक एसी क्लास टास्क फोर्स सुरू केला. प्रवाशांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी एक विशेष पथक तैनात करण्यात आले आहे, ज्याला २४/७ उपलब्ध असलेला व्हॉट्सअप तक्रार क्रमांक (ac local whatsapp complaint number), ७२०८८१९९८७ द्वारे मदत केली जात आहे. या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे प्रवाशांना अनियमित प्रवासाच्या घटनांची तक्रार करता येते, ज्यामुळे गर्दीच्या वेळी त्वरित मदत आणि आवश्यकतेनुसार पुढील कारवाई सुनिश्चित होते. समर्पित व्हॉट्सअप नंबरवर प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीचे त्वरित उत्तर दिले जाते.

जर तक्रारीत नमूद केलेल्या विशिष्ट विभागात विशेष पथक असेल तर ते ताबडतोब कारवाई करतात, परंतु जर पथक ताबडतोब उपलब्ध नसेल तर दुसऱ्याच दिवशी कारवाई केली जाते. दिनांक २५ मे-२०२४ ते १० मार्च-२०२५ या कालावधीत, एकूण ८७३५ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी १५७ तक्रारींवर त्वरित कारवाई करण्यात आली, तर ८५७८ तक्रारी दुसऱ्या दिवशी सोडवण्यात आल्या, जे १००% तक्रारींचे निराकरण दर्शवते. या सक्रिय अंमलबजावणीमुळे तक्रारींमध्ये लक्षणीय घट झाली आहे, जून-२०२४ मध्ये दैनिक सरासरी तक्रारी ७९ वरून मार्च-२०२५ मध्ये ११ पर्यंत घसरल्या आहेत. जून-२०२४ मध्ये दररोज प्राप्त होणाऱ्या कमाल तक्रारींची संख्याही २२८ प्रतिदिन होती, जी कमी होऊन १०.३.२०२५ रोजी पर्यंत २३ झाली आहे.

(हेही वाचा – Budget Session : मविआचा सभापती-अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप; विधानमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन)

प्राप्त तक्रारींचे सविस्तर विश्लेषण, केलेली कारवाई आणि विशेष पथके तैनात केल्याच्या आधारे, २५ मे-२०२४ ते १० मार्च-२०२५ या कालावधीत वातानुकूलित लोकलमध्ये योग्य तिकिटे नसताना प्रवास करणाऱ्या ८२,७७६ प्रवाशांना पकडण्यात आले आणि त्यांच्याकडून २.७१ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला, म्हणजेच दररोज सरासरी ३४८ प्रवाशांनी योग्य तिकिटे नसताना प्रवास केला आणि अशांकडून दररोज सरासरी १.१४ लाख रुपये वसूल करण्यात आले. मध्य रेल्वेने आपल्या प्रीमियम सेवांचा दर्जा राखण्यासाठी घेतलेल्या सक्रिय भूमिकेचे तसेच उपक्रमाचे प्रवाशांकडून प्रचंड कौतुक झाले आहे. एसी क्लास टास्क फोर्स व्यतिरिक्त, मध्य रेल्वे तिकीटविरहित प्रवास (ticketless travel) रोखण्यासाठी एसी लोकलमध्ये सघन तिकीट तपासणी मोहिमा राबवते. या तपासणीमुळे आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये (९ मार्च-२०२५ पर्यंत) एसी लोकलमध्ये अनियमित प्रवासाची ९२,२१७ प्रकरणे शोधण्यात मदत झाली आहे, ज्यामुळे ३.०३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ४०,३३५ प्रकरणांमध्ये १.३३ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. हे मागील वर्षाच्या तुलनेत प्रकरणांच्या संख्येत १२८% वाढ आणि दंडाच्या रकमेत १२६% वाढ दर्शवते.

उल्लेखनीय म्हणजे, मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई उपनगरीय नेटवर्कमधून दररोज सुमारे ३९ लाख प्रवासी प्रवास करतात, ज्यामध्ये ६६ वातानुकूलित लोकल सेवांचा समावेश आहे ज्यामधून दररोज सुमारे ७८००० प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे उद्दिष्ट वातानुकूलित लोकल कोचमधील अनियमित प्रवासाबाबत शून्य तक्रारी साध्य करणे आहे. नियमित तपासणी तसेच समर्पित व्हॉट्सॲप तक्रार क्रमांक (ac local whatsapp complaint number) सुरू केल्याने हे उद्दिष्ट साध्य करण्यात लक्षणीय मदत झाली आहे. प्रवाशांना अनियमित प्रवासाच्या कोणत्याही प्रकरणांची तक्रार करण्यासाठी ७२०८८१९९८७ या व्हाट्सॲप तक्रार क्रमांकाचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाते.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.