मध्य रेल्वेच्या ‘या’ एक्सप्रेस गाड्यांच्या डब्ब्यात कायमस्वरूपी वाढ!

66

मध्य रेल्वेने एक्सप्रेस गाड्यांमध्ये अधिकचे डब्बे लावण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने नमूद केलेल्या तारखांपासून खालील एक्सप्रेस गाड्यांचे डबे वाढवले जाणार आहेत.

तपशील पुढीलप्रमाणे

  • 11039 श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर – गोंदिया एक्सप्रेस दि. १.५.२०२२ पासून दोन तृतीय वातानुकूलित डब्बे.
  • 11040 गोंदिया – श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्स्प्रेसला दि. ३.५.२०२२ पासून दोन तृतीय वातानुकूलित डब्बे.
  • 12729 हडपसर – नांदेड एक्स्प्रेस – एक तृतीय वातानुकूलित डब्बा तत्काळ प्रभावाने.
  • 12730 नांदेड – हडपसर एक्स्प्रेस – एक तृतीय वातानुकूलित डब्बा तत्काळ प्रभावाने.
  • 22944 इंदौर – पुणे एक्स्प्रेस दि. १.६.२०२२ पासून एक द्वितीय वातानुकूलित डब्बा आणि एक तृतीय वातानुकूलित डब्बा.
  • 22943 पुणे – इंदौर एक्सप्रेस दि. २.६.२०२२ पासून एक द्वितीय वातानुकूलित आणि एक तृतीय वातानुकूलित.
  • 12913 इंदौर – नागपूर एक्सप्रेस दि. ५.६.२०२२ पासून एक द्वितीय वातानुकूलित आणि एक तृतीय वातानुकूलित.
  • 12914 नागपूर – इंदौर एक्सप्रेस दि. ६.६.२०२२ पासून एक द्वितीय वातानुकूलित आणि एक तृतीय वातानुकूलित.
  • 12923 डॉ. आंबेडकर नगर – नागपूर एक्सप्रेसला दि. ७.६.२०२२ पासून एक द्वितीय वातानुकूलित आणि एक तृतीय वातानुकूलित
  • 12924 नागपूर-डॉ. आंबेडकर नगर एक्सप्रेसला दि. ८.६.२०२२ पासून एक द्वितीय वातानुकूलित आणि एक तृतीय वातानुकूलित डब्बे.
  • 16541 यशवंतपूर – पंढरपूर एक्स्प्रेसमध्ये एक तृतीय वातानुकूलित तत्काळ प्रभावाने.
  • 16542 पंढरपूर- यशवंतपूर एक्स्प्रेसमध्ये एक तृतीय वातानुकूलित तत्काळ प्रभावाने.
  • 22882 भुवनेश्वर – पुणे एक्स्प्रेस दि. २९.३.१०२२ पासून एक तृतीय वातानुकूलित.
  • 22881 पुणे- भुवनेश्वर एक्सप्रेस दि. ३१.३.२०२२ पासून एक तृतीय वातानुकूलित डब्बा.

    गाड्यांची सुधारित संरचना

  • 11039/11040 – एक द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, गार्ड ब्रेक व्हॅनसह ५ सामान्य द्वितीय श्रेणी.
  • 12729/12730 एक प्रथम वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, एक तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी.
  • 22944/22943; 12913/12914 आणि 12923/12924 – दोन द्वितीय वातानुकूलित, सहा तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ४ गार्ड ब्रेक व्हॅनसह सामान्य द्वितीय श्रेणी.
  • 16541/16542 – एक प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी, एक पॅन्ट्री कार.
  • 22882/22881 – एक द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी.प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी त्यांची पीएनआर स्थिती तपासण्याची विनंती केली जाते. प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.