मध्य रेल्वेने एक्सप्रेस गाड्यांमध्ये अधिकचे डब्बे लावण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेने नमूद केलेल्या तारखांपासून खालील एक्सप्रेस गाड्यांचे डबे वाढवले जाणार आहेत.
तपशील पुढीलप्रमाणे
- 11039 श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर – गोंदिया एक्सप्रेस दि. १.५.२०२२ पासून दोन तृतीय वातानुकूलित डब्बे.
- 11040 गोंदिया – श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्स्प्रेसला दि. ३.५.२०२२ पासून दोन तृतीय वातानुकूलित डब्बे.
- 12729 हडपसर – नांदेड एक्स्प्रेस – एक तृतीय वातानुकूलित डब्बा तत्काळ प्रभावाने.
- 12730 नांदेड – हडपसर एक्स्प्रेस – एक तृतीय वातानुकूलित डब्बा तत्काळ प्रभावाने.
- 22944 इंदौर – पुणे एक्स्प्रेस दि. १.६.२०२२ पासून एक द्वितीय वातानुकूलित डब्बा आणि एक तृतीय वातानुकूलित डब्बा.
- 22943 पुणे – इंदौर एक्सप्रेस दि. २.६.२०२२ पासून एक द्वितीय वातानुकूलित आणि एक तृतीय वातानुकूलित.
- 12913 इंदौर – नागपूर एक्सप्रेस दि. ५.६.२०२२ पासून एक द्वितीय वातानुकूलित आणि एक तृतीय वातानुकूलित.
- 12914 नागपूर – इंदौर एक्सप्रेस दि. ६.६.२०२२ पासून एक द्वितीय वातानुकूलित आणि एक तृतीय वातानुकूलित.
- 12923 डॉ. आंबेडकर नगर – नागपूर एक्सप्रेसला दि. ७.६.२०२२ पासून एक द्वितीय वातानुकूलित आणि एक तृतीय वातानुकूलित
- 12924 नागपूर-डॉ. आंबेडकर नगर एक्सप्रेसला दि. ८.६.२०२२ पासून एक द्वितीय वातानुकूलित आणि एक तृतीय वातानुकूलित डब्बे.
- 16541 यशवंतपूर – पंढरपूर एक्स्प्रेसमध्ये एक तृतीय वातानुकूलित तत्काळ प्रभावाने.
- 16542 पंढरपूर- यशवंतपूर एक्स्प्रेसमध्ये एक तृतीय वातानुकूलित तत्काळ प्रभावाने.
- 22882 भुवनेश्वर – पुणे एक्स्प्रेस दि. २९.३.१०२२ पासून एक तृतीय वातानुकूलित.
- 22881 पुणे- भुवनेश्वर एक्सप्रेस दि. ३१.३.२०२२ पासून एक तृतीय वातानुकूलित डब्बा.
गाड्यांची सुधारित संरचना
- 11039/11040 – एक द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, १० शयनयान, गार्ड ब्रेक व्हॅनसह ५ सामान्य द्वितीय श्रेणी.
- 12729/12730 एक प्रथम वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, एक तृतीय वातानुकूलित इकॉनॉमी, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी.
- 22944/22943; 12913/12914 आणि 12923/12924 – दोन द्वितीय वातानुकूलित, सहा तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ४ गार्ड ब्रेक व्हॅनसह सामान्य द्वितीय श्रेणी.
- 16541/16542 – एक प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी, एक पॅन्ट्री कार.
- 22882/22881 – एक द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, २ सामान्य द्वितीय श्रेणी.प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी त्यांची पीएनआर स्थिती तपासण्याची विनंती केली जाते. प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.