…तर मुंबईतील वाढत्या गोवरच्या साथीबाबतचा अहवाल थेट दिल्लीत?

मुंबईत वाढत्या गोवरच्या साथीबाबत माहिती घेण्यासाठी केंद्रीय समितीचा अहवाल सोमवारी पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र हा अहवाल राज्य सरकार किंवा थेट दिल्लीतील केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाला दिला जाऊ शकतो. मुंबईत गोवरची साथ येण्यामागे पालिका आरोग्य विभागाकडून सुरु असलेली लसीकरण योजना तसेच उपचार पद्धती केंद्रीय समितीकडून तपासल्या जात आहेत.
शनिवारी राज्य आरोग्य विभागाची टीम मुंबई राज्यातील आपापल्या घरी परतली. रविवारच्या साप्ताहिक सुट्टीनंतर सोमवारी राज्य आरोग्य विभागाचे पथक पुन्हा मुंबईत येईल. दरम्यान, केंद्रीय पथकाने घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाला भेट देत गोवरच्या पहिल्या मृत्यूप्रकरणी चौकशी केली. गोवर  तसेच रुबेला आजार नियंत्रणात आणण्यासाठी पालिका रुग्णालये तसेच दवाखान्यालाही केंद्रीय पथकाची भेट देणे सुरु राहिल. सोमवारी केंद्रीय पथक पुन्हा काही ठिकाणांना भेट देईल. पालिका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबईतील संशयित रुग्णांची संख्या आता 740 वर पोहोचली आहे. वाढत्या संशयित रुग्णांची संख्या लक्षात घेत एमआर 1 प्रकारातील लसीकरण 5 हजार 668 आणि एमएमआर प्रकारचे लसीकरण 4 हजार 256 जणांना दिले गेले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here