Cervical Cancer Vaccine DCGI च्या विषय तज्ज्ञ समितीने 9 ते 26 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील गर्भाशयाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया द्वारे गर्भाशयाच्या कर्करोगाविरुद्ध प्रथम स्वदेशी लस क्वाड्रिव्हॅलेंट ह्यूमन पॅपिलोमाव्हायरल लसीवर बुधवारी विषय तज्ञ समितीने चर्चा केली.
सिरम इन्स्टिट्यूटला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग विरोधी QHPV लस निर्मितीसाठी तसेच मार्केटिंग मान्यतेसाठी शिफारस करण्यात आली आहे. प्रकाश कुमार सिंग, SII चे संचालक यांनी QHPV साठी 8 जून रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया यांच्याशी संपर्क साधला. तसेच याच्या मार्केटिंग मंजुरीसाठी अर्ज केला होता.
( हेही वाचा: आता जनरल तिकीट घेऊन मेल आणि एक्सप्रेसमधून करा प्रवास )
काय म्हटलंय अर्जात
अर्जात सिंग म्हणाले की, QHPV लस CervaVAc ने सर्व वयोगटांमध्ये बेसलाइनपेक्षा जवळपास, 1 हजार पट जास्त अॅंटीबाॅडींचा प्रतिसाद दाखवला आहे. दरवर्षी लाखो महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तसेच इतर काही कर्करोगाचे निदान होते आणि मृत्यूचे प्रमाणही खूप जास्त आहे. प्रकाश कुमार म्हणाले की, जीवरक्षक लसींप्रमाणे, आम्ही भारतातील पहिल्या स्वदेशी जीवरक्षक qHpV लसीकरण आपला देश स्वावलंबी बनवण्यासाठी वचनबद्ध आहोत. यामुळे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वोकल फाॅर लोकलचे स्वप्न पूर्ण होईल.
Join Our WhatsApp Community