सीईटीचे ( CET Exam) वेळापत्रक जाहीर झाले आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 वर्षाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत जानेवारीतच विद्यार्थ्यांना आपला अर्ज भरता येणार आहे. सीईटी परीक्षांना 2 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिली बीएड आणि एमएड तीन वर्षे एकत्रित वर्षाला प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांची सीईटी होणार आहे. 18 परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.
व्यावसायिक अभ्यासक्रमांना पुढील वर्षी प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना आतापासूनच परीक्षांची तयारी करता यावी यासाठी 19 अभ्यासक्रमांच्या प्रवेश पूर्व परीक्षा (सीईटी)चे वेळापत्रक (CET Exam) जाहीर केल्यानंतर आता प्रत्यक्ष नोंदणीलाही नव्या वर्षाच्या प्रारंभीच सुरुवात केली आहे.
(हेही वाचा – अभिनयापासून राजकारणात प्रभाव पाडणारे तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रदन म्हणजेच MGR)
या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. 10 जानेवारीपासूनचे सविस्तर वेळापत्रक सीईटीने जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना सुमारे अर्ज भरण्यासाठी 20 ते एक महिन्याचा कालावधी मिळणार आहे.
एमएचटी-सीईटी परीक्षा 16 ते 30 एप्रिलदरम्यान होणार
तब्बल 5 लाखाहून अधिक विद्यार्थी नोंदणी होणार्या एमएचटी-सीईटी परीक्षा 16 ते 30 एप्रिलदरम्यान होणार आहेत. यंदा प्रथमच बी-प्लॅनिंगची सीईटी होणार नाही तर हे प्रवेश एमएचटी सीईटीतील गुणांच्या आधारे होणार आहेत, तर नर्सिंग प्रवेशासाठी एएनएम,जीएनएम ही परीक्षा सीईटी सेलकडून घेतली जाणार आहे. एमएचटी-सीईटी 16 ते 30 एप्रिलमध्ये आहे. या परीक्षेचा अर्ज 16 जानेवारीपासून भरता येणार आहे. यंदा ही परीक्षा गतवर्षीच्या तुलनेत 22 दिवस ही परीक्षा अगोदर नियोजन केले आहे. गतवर्षी 9 ते 20 मे या कालावधीत 24 सत्रात परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला 3 लाख 54 हजार 573 मुलांनी तर 2 लाख 81 हजार 515 मुलींनी नोंदणी केली होती. असे 6 लाख 36 हजार 089 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावी परीक्षा संपल्यानंतर सीईटी वेळेत व्हावी आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी नोंदणी आणि परीक्षेचे नियोजन अगोदरच जाहीर केल्याची माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community