CET परिक्षेच्या तारखा जाहीर; जाणून घ्या कधी होणार परीक्षा?

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MHT CET 2023 परीक्षेच्या तात्पुरत्या तारखा जाहीर केल्या आहेत. जे उमेदवार परीक्षेला बसणार आहेत. ते विद्यार्थी या अधिकृत वेबसाईट mahacet.org वर जाऊन वेळापत्रक डाउनलोड करु शकता. तसेच, MHT CET 2023ची परीक्षा 9 मे 2023 पासून सुरु होणार आहे.

अभियांत्रिकी, कृषी, बी फार्मसी अशा अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणा-या सीईटी पीसीएम ग्रुपमधील परीक्षा 9 ते 13 मे दरम्यान, तर पीसीबी ग्रुपसाठी 15 ते 20 मे दरम्यान होणार आहे. तर विधी अभ्यासक्रमात एलएलबीसाठी 1 एप्रिल, तर एलएलबी 2 आणि 3 मेला परीक्षा होणार आहे.

( हेही वाचा: रविवारी एकाच दिवशी तब्बल ७७ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी रेखाटली चित्रे )

पाहा परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक

MHT CET PCM – परीक्षा 9 मे ते 13 मे दरम्यान PCB- 15 ते 20 मे या कालावधीपर्यंत.

CET परीक्षा

MBA/MMS- परीक्षा 18 मार्च ते 19 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे. MAH LLB 5 वर्षे- 1 एप्रिल 2023 MAH LLB 3 वर्षे- 2 मे आणि 3 मे 2023 B.A/ B.Sc, B.Ed (चार वर्षांचे एकात्मिक अभ्यासक्रम)- 2 एप्रिल 2023

दरम्यान, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसबोत, महाराष्ट्र राज्य सेल कायदा, कला, बीएड आणि इतर विविध अभ्यासक्रमांसाठी सीईटी आयोजित करते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here