सीईटी परीक्षेमध्ये सर्व्हर डाऊन झाल्यामुळे गुरूवारी बोरिवलीत मोठा गोंधळा निर्माण होऊन, याचा तब्बल ३०० अधिक विद्यार्थ्यांना फटका बसला. राज्यात गुरूवारी इंजिनिअरिंगची सीईटी परीक्षा होती.
( हेही वाचा : मुंबई ते चेन्नई प्रवास होणार सुसाट…)
सीईटी परीक्षेत सर्व्हर डाऊन
सकाळी ९ ते ११ या वेळेत परीक्षेचा पहिला टप्पा तर दुसरा टप्पा २ ते ४ या वेळेत होणार होता. परंतु सर्व्हर डाऊन असल्याने सकाळच्या सत्रात परीक्षा सुरू होऊ शकली नाही. परिणामी दुपारच्या सत्रातील विद्यार्थी सुद्धा परीक्षेला मुकले. परीक्षा होणार आहे की पुढे ढकलली जाणार याबाबत विद्यार्थ्यांना अद्याप काही माहिती देण्यात आलेली नाही.
Join Our WhatsApp Community