राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे सीईटी सेल घेण्यात येणा-या विविध प्रवेश परीक्षांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता 11 मेपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल. सीईटी सेलने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा सीईटी सेलतर्फे घेतली जाते.
नोंदणीसाठी मुदतवाढ
एमएचटी-सीईटी, एमसीए, पदव्युत्तर आर्किटेक्चर, पदव्युत्तर एमएचसीटी या परीक्षांसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यास मुदतवाढ दिली. विलंब शुल्कासह विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. ही मुदतवाढ अंतिम असून, यापुढे मुदतवाढ देण्यास येणार नसल्याची विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घेण्याचे सीईटी सेलने नमूद केले आहे.
( हेही वाचा: बेस्ट – लोकलवर झळकणार भारत- इस्त्राईलची मैत्री )
परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा ही महाराष्ट्रातील संस्थांमध्ये अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान, फार्मसी आणि कृषी प्रवेशासाठीची परीक्षा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेल, महाराष्ट्र द्वारे घेतली जाते. यापूर्वी जूनमध्ये होणारी प्रवेश परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आता महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य आणि राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. या परीक्षेच्या संभाव्य तारखांचे वेळापत्रक ऑफिशिअल वेबसाईटवर जारी करण्यात आले आहे.
CET वेळापत्रक. pic.twitter.com/79M1KYS5Wq
— Uday Samant (@samant_uday) May 2, 2022
Join Our WhatsApp Community