रेल्वे प्रवासात चोरट्यांनी पैशांचे पाकिट मारल्याचा किंवा दागिने चोरल्याचा अनुभव आपण घेतला किंवा ऐकला असेल. अलिकडच्या काळात हे चोरटे जास्त सोकावल्याचे निदर्शनास येत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेमधून प्रवास करणा-या प्रवाशांच्या दागिन्यांवर हे डल्ला मारुन गेल्या दोन वर्षांत हे चोरटे कोट्यधीश झाल्याची माहिती मिळत आहे.
2020-2022 या दोन वर्षांच्या काळात मध्य आणि पश्चिम रेल्वेतील प्रवासादरम्यान एकूण 1 कोटी 2 लाखांहून अधिक सोने आणि चांदीचे दागिने चोरीला गेल्याची नोंद लोहमार्ग पोलिसांकडे झाली आहे. ही चोरीला गेलेली मालमत्ता मिळवण्यात पोलिसांना फारसे यश आल्याचे दिसत नाही. आतापर्यंत अवघ्या 71 लाख किंमतीचे दागिने प्रवाशांना परत करण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांकडून देण्यात आली आहे.
(हेही वाचाः विद्यार्थ्यांनो… आता निवांत पेपर सोडवा, लेखी परीक्षेसाठीची वेळ वाढली)
निर्बंध हटल्यानंतर झाली वाढ
कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे मार्च 2020 पासून रेल्वे वाहतुकीवर बंधने घालण्यात आली होती. त्याआधी असंख्य प्रवासी लोकल गाड्यांमधून प्रवास करत होते. प्रवाशांची संख्या कमी झाल्याने कोरोना काळात लोकमधील चोरीच्या घटनाही कमी झाल्या होत्या. पण कोरोनाचे निर्बंध हटल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढल्याने चोरीच्या गुन्ह्यांची संख्या देखील वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
महिल्यांच्या डब्यात सर्वाधिक चो-या
लोकल गाड्यांमधील सर्वाधिक चो-या महिलांच्या डब्यातच होत आहेत. मंगळसूत्रे, सोन्याच्या साखळ्या व इतर काही चांदीचे दागिने चोरील जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. लोकल ट्रेन, पादचारी पूल किंवा फलाटांवरील गर्दीत सुद्धा चोरटे संधी साधत असल्याचे कळत आहे. तसेच गर्दीच्या वेळी लोकल ट्रेनमधील रॅकवर ठेवलेल्या बॅग लंपास करण्याचे प्रकार देखील वाढत आहेत.
(हेही वाचाः कोरोनाचा कुठलाही येऊ दे अवतार, बेस्ट कर्मचारी सुरक्षितच राहणार)
गुन्ह्यांमध्ये वाढ
मध्य व पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवरील लोहमार्ग पोलिस ठाण्यांत 2020, 2021, 2022 दरम्यान मार्चअखेर एकूण 193 गुन्हे दाखल झाले. यातील केवळ 106 गुन्ह्यांतील ऐवज पोलिसांच्या हाती लागला आहे. एकूण 1 कोटी 2 लाख 34 हजार 318 रुपये किंमतीचे दागिने चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2020 मध्ये लॉकडाऊन असल्यामुळे त्या तुलनेत 2021 मध्ये दागिन्यांच्या चोरीचे गुन्हे वाढले आहेत.
इतक्या गुन्ह्यांची उकल
2021 मध्ये दाखल झालेल्या एकूण 89 गुन्ह्यांपैकी 50 गुन्ह्यांची उकल झाली आहे. तर 2022 मध्ये पहिल्या तीन महिन्यांत एकूण 29 गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी 10 गुन्हे सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे. 2020 च्या पहिल्या तिमाहीत गुन्ह्यांची ही संख्या 75 इतकी होती.
(हेही वाचाः Zomato, Swiggy प्रमाणे आता Ola सुद्धा १० मिनिटांत करणार फूड डिलिव्हरी!)
Join Our WhatsApp Community