‘हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे आणि त्यांचे पुनर्वसन अधिनियम २०१३’ या संदर्भात राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष एम. वेंकटेशन यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका मुख्यालयामध्ये १४ जुलै २०२३ बैठक पार पडली. आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा, स्वीय सचिव शशांक सिंग, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव आणि संबंधित अधिकारी आदींची या बैठकीस उपस्थिती होती.
(हेही वाचा – ठाकरे गटाकडे मशाल राहणार की जाणार? सर्वोच्च न्यायालयात १७ जुलैला सुनावणी)
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील स्वच्छता कर्मचारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, विविध कंत्राटी सेवा प्रदात्यांचे संचालक आदींनी यावेळी स्वच्छता कामगारांच्या विविध समस्या आणि प्रश्न मांडले. कामगारांच्या समस्या आणि प्रश्नांची उकल करण्यासाठी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग कटिबद्ध असल्याची भावना अध्यक्ष वेंकटेशन यांनी व्यक्त केली. तर, कामगार हे महानगरपालिकेचे महत्वपूर्ण घटक असून त्यांच्या समस्यांचे यथोचित निराकरण केले जाईल, असे अतिरिक्त आयुक्त वेलरासू आणि हर्डीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community