Chakshu Portal : सायबर गुन्ह्यांवर आता केंद्र सरकारचा चक्षू; लाँच केले नवे ॲप

Chakshu Portal : वापरकर्त्यांना ते मेसेज सेक्सटॉर्शन, बनावट ग्राहक हेल्पलाईन, बनावट केवायसी यांसारख्या संवाद कोणत्या श्रेणीत ते मेसेज बसतात, हे स्पष्ट करावे लागेल.

235
Chakshu Portal : सायबर गुन्ह्यांवर आता केंद्र सरकारचा चक्षू; लाँच केले नवे ॲप
Chakshu Portal : सायबर गुन्ह्यांवर आता केंद्र सरकारचा चक्षू; लाँच केले नवे ॲप

सायबर गुन्हे आणि स्पॅम कॉल रोखण्यासाठी केंद्र सरकारने चक्षू ॲप लाँच केले आहे. चक्षू ॲपच्या माध्यमातून लोक सहजपणे सायबर गुन्हे (Cyber ​​crime) किंवा स्पॅम कॉलची (Spam call) तक्रार करू शकतात. दूरसंचार विभागाने (डीओटी) गेल्या वर्षी मे महिन्यात उद्घाटन करण्यात आलेल्या संचार साथी पोर्टलचा एक भाग म्हणून डिजिटल गुप्तचर मंच सुरु केला आहे. (Chakshu Portal)

(हेही वाचा – Facebook Instagram Down : जगभरात फेसबुक, इंस्टाग्राम डाऊन; आपोआप होतेय लॉगआऊट)

तक्रार करतांना द्यावा लागणार स्क्रीनशॉट 

वापरकर्त्यांचे क्रमांक, मेसेज इत्यादींसह फसवणूक किंवा स्पॅम कॉलची तक्रार करण्यासाठी नागरिक चक्षू अॅपचा वापर करू शकतात. वापरकर्ते संचार साथी पोर्टलवरील इनबिल्ट आय विंडोमध्ये लॉग इन करू शकतात आणि एसएमएस, कॉल किंवा व्हॉट्स ॲपसारख्या फसव्या माध्यमांद्वारे संबंधित तपशीलांसह फॉर्म भरू शकतात. तथापि वापरकर्त्यांना ते मेसेज सेक्सटॉर्शन, बनावट ग्राहक हेल्पलाईन, बनावट केवायसी यांसारख्या संवाद कोणत्या श्रेणीत ते मेसेज बसतात, हे स्पष्ट करावे लागेल. वापरकर्ता ही तक्रार करतांना स्क्रीनशॉट किंवा त्याच्या तक्रारीशी संबंधित इतर कोणतीही माहिती देखील समाविष्ट करू शकतो.

सायबर फसवणूक ओळखण्याची गती वेगवान होणार – माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव

डिजिटल गुप्तचर मंच (Digital Intelligence Platform) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि वॉलेट ऑपरेटर इत्यादींसह सायबर गुन्हेगारीची माहिती एकत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, फसवणूक झाल्याचा संशय आल्यास ही माहिती सर्व भागधारकांसोबत सामायिक केली जाईल. यापूर्वी कायद्याची अंमलबजावणी करणारे, बँका आणि वित्तीय सेवा पुरवठादार या सर्वांना फसव्या क्रमांकांची तक्रार करण्यास सांगितले जात होते, परंतु त्यांनी ते वैयक्तिकरित्या केले. पण डीआयपी हा एक सामूहिक मंच आहे; ज्यावर तुम्ही फसवणुकीची तक्रार त्वरित करू शकता. गेल्या वर्षी मे महिन्यात सुरू करण्यात आलेल्या प्रणालीची ही एक नैसर्गिक प्रगती आहे आणि या दोन मंचांच्या मदतीने सायबर फसवणूक ओळखण्याची गती वेगवान होईल.

Digital Intelligence Platform च्या मदतीने सुमारे 1,008 कोटी रुपयांपर्यंतची फसवणूक रोखली गेली आहे. अलीकडच्या काळात धोका बनलेल्या आंतरराष्ट्रीय फसवणुकीच्या कॉल्सवर आम्ही प्रभावीपणे नियंत्रण ठेवले आहे, असेही अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. (Chakshu Portal)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.