‘चला जाणूया नदीला’… सरकारच्या अनोख्या उपक्रमाला सुरूवात!

302

गोदावरी नदी अविरल, स्वच्छ, सुंदर व बारमाही वाहण्यासाठी आता सरकार व शासनाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठीच त्र्यंबकेश्वर येथील गंगाद्वार मधून “चला जाणूया नदीला” उपक्रमातंर्गत अमृत महोत्सव नदी यात्रेची सुरुवात करण्यात आली.

( हेही वाचा : श्रीकृष्णाचा निस्सिम भक्त ‘लिटन दास’ बांगलादेशचा ‘हिंदू’ तारणहार)

या कार्यक्रमादरम्यान गोदावरी व तिच्या उपनद्या स्वच्छ, सुंदर व प्रदूषण विरहीत कशा राहतील याबाबत माहिती व सूचना केल्या. तसेच शासनाच्यावतीने आलेल्या अधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या सुरू असलेल्या विविध योजनांबद्दल माहिती देत पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांबद्दल जनजागृती केली. यावेळी गोदावरीच्या उपनद्यांवर काम करणाऱ्या गोदासेवकांना कलश देऊन कार्याची सुरूवात करण्यात आली. यावेळी नंदिनी, वालदेवी, कपिला, वरुणा, मोती, अगस्ती, माळुंगी या नद्यांवर काम करणाऱ्या गोदासेवकांच्या हाती कलश सुपूर्द करण्यात आला.

“चला जाणूया नदीला” उपक्रमाचे उद्दीष्ट….

  • तब्बल ९० नद्या प्रवाहित करणार
  • एक लाख स्वदेशी वृक्ष लागवड
  • नागरिकांमध्ये जनजागृती
  • बंधारे बांधणे
  • भूजल पातळी वाढविणे
  • वनसंरक्षण करणे
  • नदीचे प्रदूषण थांबविणे

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुपलीची मेट या गावचे गावकरी, ब्लॉगर्स ग्रुपचे सदस्य व ग्रुप सत्संग फाऊंडेशनच्या वतीने दगड व माती गोळी करत बंधारा बांधण्याच्या कामाची प्रत्यक्ष सुरूवात केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.